Coronavirus: घाई नको! भारतात १० आठवड्यांचा लॉकडाऊन ठेवा; तज्ज्ञांचा भारताला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 10:12 AM2020-04-24T10:12:35+5:302020-04-24T11:11:44+5:30
भारताने इतक्यात लॉकडाऊन हटवण्याची घाई करू नये.
नवी दिल्ली: जगभरात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही २५ लाखांवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतासह अनेक देशांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाला आळा घालण्यासाठी आतापर्यंत योजलेल्या उपायांना बऱ्यापैकी यश आले असले तरी अजूनही नवे संसर्ग व नवे मृत्यू होतच आहेत. त्यामुळे ज्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे, त्या भागात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र भारताने इतक्यात लॉकडाऊन हटवण्याची घाई करू नये. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असल्यास भारतात किमान १० आठवडे लॉकडाऊन राहायला हवा. लॉकडाऊन उठवण्याची घाई केल्यास मोठा अनर्थ ओढावू शकतो, असा इशारा जगातील आघाडीच्या वैद्यकीय जर्नल 'द लान्सेट'चे मुख्य संपादक रिचर्ड हॉर्टन यांनी दिला आहे.
Palghar Mob Lynching: 'मी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण...'; सरपंचांनी सांगितला घटनाक्रम
रिचर्ड हॉर्टन म्हणाले की, प्रत्येक देशातील कोरोनीची साथ कायमस्वरुपी राहणार नाही. सर्व देश कोरोनाचा उद्रेक नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत. भारताने लॉकडाऊन उठवण्याची घाई करू नये. लॉकडाऊन उठवण्याची घाई केली तर कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत भारत सापडू शकतो. ही लाट पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर असू शकते. तसेच आतापर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये केलेले प्रयत्न वाया जातील. त्यामुळे किमान १० आठवडे लॉकडाऊन पाळाच, असा सल्ला रिचर्ड हॉर्टन यांनी भारताला दिला आहे.
कोरोना 10 आठवड्यांनंतर पसरण्याची शक्याता कमी आहे, कारण फारच कमी जणांमध्ये तेव्हा संसर्ग कायम असेल. 10 आठवड्यांच्या शेवटी, आपण सावधगिरी बाळगल्यास मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. लॉकडाऊनची कार्यक्षमता राखण्यासाठी चाचणी आणि संपर्क ट्रेसिंग करणे आवश्यक असल्याचेही रिचर्ड हॉर्टन यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी ३ मेपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन सुरु ठेवला आहे. कोरोना संक्रमण साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणे गरजेचे आहे. सध्या भारतात २१ हजार ७०० कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर ७०० च्या वर लोकांचा जीव गेला आहे. गेल्या २४ तासात १ हजार ४०९ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
आणखी वाचा...
सावधान! आता पीएफ अॅडव्हान्स काढाल तर 10 वर्षांनी पस्तावाल
मुलगा झाला म्हणून अख्ख्या पंचक्रोशीत बत्ताशे, लाडू वाटले; निघाला कोरोना पॉझिटिव्ह
विखारी पाकिस्तान! भारताविरोधात मोठ्या सायबर युद्धाला सुरुवात
कोरोनाचे दुष्परिणाम; तब्बल २५ कोटी बळी जाण्याची भीती