Agni Prime missile: जय हो! भारताला मिळालं मोठं यश, 'अग्नि-प्राइम' मिसाईलची यशस्वी चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 12:42 PM2021-06-28T12:42:03+5:302021-06-28T12:43:11+5:30
Agni-Prime missile : भारताच्या शस्त्रास्त्र ताकदीत आज आणखी एक मिसाईलची भर पडली आहे.
भारताच्या शस्त्रास्त्र ताकदीत आज आणखी एक मिसाईलची भर पडली आहे. भारतानं सोमवारी ओडिशाच्या किनाऱ्यावर अग्नि-प्राइम मिसाईलची यशस्वी चाचणी केली आहे. डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अग्नी-प्राइम मिसाईलची २ हजार किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. याशिवाय इतर मिसाईलपेक्षा अग्नि-प्राइम मिसाईल लहान आणि वजनानं हलकी आहे. अत्याधुनिक पद्धतीनं मिसाईल डिझाइन करण्यात आली आहे. (India successfully test-fired the Agni-Prime missile today, off the coast of Odisha)
India successfully test-fired the Agni-Prime missile today, off the coast of Odisha.
— ANI (@ANI) June 28, 2021
It can hit targets up to a range of 2000 kms, & is very short & light in comparison with other missiles in this class. A lot of new technologies incorporated in the new missile: DRDO officials pic.twitter.com/zq7ffypqFM
एएनआय वृत्तसंस्थेनं अग्नि-प्राइम मिसाईलची यशस्वी चाचणी झाल्याबाबतचं वृत्त दिलं आहे. यासंदर्भातील एक ट्विट एएनआयनं केलं आहे.