आता चीनही भारताच्या टप्प्यात, अग्नी 5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2018 03:38 PM2018-06-03T15:38:34+5:302018-06-03T15:38:34+5:30
भारतानं आज स्वदेशी बनावटीच्या अग्नी-5 या क्षेपणास्त्राची यशस्वी परीक्षण केलं आहे. विशेष म्हणजे अग्नी-5 क्षेपणास्त्र आण्विक शस्त्रास्त्रवाहू आहे.
बालासोर- भारतानं आज स्वदेशी बनावटीच्या अग्नी-5 या क्षेपणास्त्राची यशस्वी परीक्षण केलं आहे. विशेष म्हणजे अग्नी-5 क्षेपणास्त्र आण्विक शस्त्रास्त्रवाहू आहे. अग्नी-5 या क्षेपणास्त्राची 5000 किलोमीटरपर्यंतची मारक क्षमता असून, ओडिशातल्या बालासोरमधील डॉ. अब्दुल कलाम केंद्रावरून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
अग्नी-5 क्षेपणास्त्र हे आतापर्यंत सर्वाधिक अत्याधुनिक तंत्रज्ञानानं युक्त आहे. अग्नी-5 हे क्षेपणास्त्र जमिनीवरूनच जमिनीवर यशस्वी मारा करू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार बंगालच्या खाडीजवळच्या कलाम केंद्रावरून टेस्ट रेंज पॅड- 4वरून सकाळी 9.48 वाजता या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण करण्यात आलं. आतापर्यंत अग्नी-5चं परीक्षण जवळपास सहा वेळा करण्यात आलं आहे. प्रत्येक परीक्षणादरम्यान क्षेपणास्त्रातील अंतर वाढवण्यात आलं आहे.
Odisha: Agni-5 test fired from Integrated Test Range (ITR) at Abdul Kalam Island off Odisha coast today at 9.48 am. pic.twitter.com/RKmvIS269L
— ANI (@ANI) June 3, 2018
20 मीटर लांबी आणि 50 टन वजन असलेले अग्नी 5 हे क्षेपणास्त्र आण्विक शस्त्रंही वाहून नेऊ शकते. या क्षेपणास्त्राच्या उड्डाणाची कामगिरी ट्रॅक करण्यात आली असून, रडार, उपकरणं आणि ऑब्जर्व्हेशन स्टेशन्सच्या माध्यमातून त्याला मॉनिटर करण्यात येतं. तसेच या क्षेपणास्त्रात नेव्हिगेशन आणि दिशा- निर्देशन, वॉरहेड आणि इंजिनसंबंधी नव्या आणि अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे याचा भारताला मोठा फायदा होणार आहे.