3500 किलोमीटर दूरवर हवेतच नेस्तनाबूत होणार शत्रूचं विमान, K-4 बॅलिस्टिक मिसाइलची यशस्वी चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 08:59 AM2020-01-20T08:59:28+5:302020-01-20T08:59:34+5:30
चीन आणि पाकिस्तानच्या प्रमुख शहरांना आवाक्यात घेण्याची क्षमता असलेल्या K-4 बॅलिस्टिक मिसाइलची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.
नवी दिल्लीः चीन आणि पाकिस्तानच्या प्रमुख शहरांना आवाक्यात घेण्याची क्षमता असलेल्या K-4 बॅलिस्टिक मिसाइलची भारताकडून यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. भारतानं आण्विक हल्ला करण्यात सक्षम असलेल्या बॅलिस्टिक मिसाइलचं यशस्वी परीक्षण केलं. ओडिशाच्या किनाऱ्यावरील चांदीपूर येथून आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर 3500 किलोमीटरपर्यंत मारक क्षमता असलेल्या K-4 बॅलिस्टिक मिसाइलची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
या पाणबुडी मिसाइलला संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे(DRDO)नं तयार केलं आहे. या मिसाइलला भारतीय नौसेना स्वदेशी बनावटीच्या आयएनएस अरिहंत-श्रेणीच्या पाणबुडीत तैनात करणार आहे. ही मिसाइल जमिनीपासून हवेत मारा करून लक्ष्य भेदण्यात सक्षम आहे. QRSAM यंत्रणेंतर्गत कोणत्याही सैन्य अभियानांतर्गत मिसाइल गतिमान राहते. तसेच शत्रूचं विमान किंवा ड्रोनवर नजर ठेवून तात्काळ त्याला लक्ष्य बनवते.
देशात बनवलेली अरिहंत क्लासच्या आण्विक पाणबुडीला तैनात करण्यात येणार आहे. भारताकडे आयएनएस अरिहंत आण्विक पाणबुडी आहे. तर अन्य एका पाणबुडीचा समावेश करण्यात येणार असून, जमीन, हवा आणि पाण्यातून आण्विक क्षेपणास्त्राचा मारा करण्याची क्षमता ठेवणारा भारत जगातील सहावा देश ठरला आहे. अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि चीन या देशांसह भारताचा यात समावेश झाला आहे. अशाच प्रकारे पिनाका मिसाइलचीही यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. अर्टिलरी मिसाइल सिस्टम पिनाकाला 75 किलोमीटर दुरून निशाणा लावता येऊ शकतो. पिनाका एमके-2 रॉकेटला नेव्हिगेशन, कंट्रोल आणि गायडन्स सिस्टीम जोडून मिसाइल विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे रेंज वाढण्यासह लक्ष्य भेदण्याची क्षमताही उत्कृष्ट झाली आहे.Govt sources:India today successfully test-fired 3,500 km strike range nuclear capable submarine-launched K-4 ballistic missile off coast of Andhra Pradesh. The missile under development by DRDO will be equipped on indigenous INS Arihant-class nuclear-powered submarines of Navy. pic.twitter.com/qOcblC269Z
— ANI (@ANI) January 19, 2020