हिंद-प्रशांत क्षेत्रात नियम आधारित व्यवस्थेला भारत-थायलंडचे समर्थन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बँकॉकमध्ये प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 10:24 IST2025-04-04T10:23:43+5:302025-04-04T10:24:01+5:30
India-Thailand Relation: भारत आणि थायलंडने संबंध दृढ करून रणनीतिक भागीदारी स्तरापर्यंत नेण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंद-प्रशांत क्षेत्रात मुक्त, सर्वसमावेशक व नियम आधारित व्यवस्थेचे समर्थन केले. तसेच विस्तारवादाऐवजी विकासाच्या नीतीमध्ये विश्वास असल्याचे सांगितले.

हिंद-प्रशांत क्षेत्रात नियम आधारित व्यवस्थेला भारत-थायलंडचे समर्थन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बँकॉकमध्ये प्रतिपादन
बँकॉक - भारत आणि थायलंडने संबंध दृढ करून रणनीतिक भागीदारी स्तरापर्यंत नेण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंद-प्रशांत क्षेत्रात मुक्त, सर्वसमावेशक व नियम आधारित व्यवस्थेचे समर्थन केले. तसेच विस्तारवादाऐवजी विकासाच्या नीतीमध्ये विश्वास असल्याचे सांगितले.
मोदी यांनी थायलंडच्या पंतप्रधान पॅतोंगनार्त शिनावात्रा यांच्याबरोबर शिष्टमंडळस्तरीय चर्चेनंतर एका संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिनावात्रा यांच्याबरोबर झालेल्या चर्चेबाबत ते म्हणाले की, भारताची ईशान्य राज्ये व थायलंड यांच्यात पर्यटन, संस्कृती-शिक्षणाच्या क्षेत्रात सहयोगावर भर दिला आहे. आम्ही व्यापार, गुंतवणूक व्यवसायांत आदान-प्रदान वाढवण्यावर चर्चा केली. एमएसएमई, हातमाग व हस्तशिल्प क्षेत्रात सहयोग करण्याबाबत समझोता करण्यात आला.
गार्ड ऑफ ऑनर
सहाव्या बिम्सटेक शिखर संमेलनात सहभाग नोंदवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसीय दौऱ्यावर आले आहेत.
मोदी थायलंडमध्ये दाखल झाल्यावर त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
पंतप्रधान या दौऱ्यात थायलंड, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, म्यानमार
व भूतानच्या नेत्यांशी भेटत आहेत.
पंतप्रधानांनी मानले आभार
माझ्या दौऱ्यानिमित्त रामायण भित्तिचित्रांवर आधारित एक विशेष टपाल तिकीट प्रकाशित केल्याबद्दल मी थायलंड सरकारचे आभार मानतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मोदी म्हणाले की, रामायण कथा ही थायलंडच्या लोकजीवनाशी एकरूप झाली आहे.