विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या आकडेवारीत महाराष्ट्र आघाडीवर; धक्कादायक अहवाल समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 12:51 PM2024-08-29T12:51:24+5:302024-08-29T12:54:02+5:30

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची धक्कादायक आकडेवारी एका अहवालातून समोर आली आहे.

India the student death rate is higher than the population growth rate | विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या आकडेवारीत महाराष्ट्र आघाडीवर; धक्कादायक अहवाल समोर

(फोटो सौजन्य - Reuters)

India Student Suicide Report:  भारतात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय. अशातच लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा आत्महत्येच्या घटनांमध्ये वेगाने वाढ होत असल्याचे एका नवीन अहवालातून समोर आले आहे. या अहवालातून महाराष्ट्राच्या बाबतीत धक्कादायक माहिती समोर आलं आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र आघाडीवर असून देशातील एकूण आत्महत्येच्या १४ टक्के आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. एनसीआरबीच्या अहवालानुसार हे संकट सतत वाढत असल्याचे समोर आलं आहे. दरवर्षी आत्महत्येचे प्रमाण २ टक्क्यांनी वाढत असू आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ४ टक्क्यांनी वाढ होत आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या डेटावर आधारित वार्षिक आयसी ३ कॉन्फरन्स आणि एक्स्पो २०२४ मध्ये बुधवारी "विद्यार्थी आत्महत्या: भारतात वाढणारी महामारी" हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. आत्महत्यांच्या घटनांमध्ये दरवर्षी दोन टक्क्यांनी वाढ झाल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे, तर विद्यार्थी आत्महत्येच्या घटनांमध्ये चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. "गेल्या दोन दशकांमध्ये, विद्यार्थी आत्महत्यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या दुप्पट, चार टक्क्यांनी चिंताजनक वार्षिक दराने वाढले आहे," असे आयसी ३ संस्थेच्या संलग्न अहवालात म्हटले आहे.

सन २०२२ मध्ये एकूण विद्यार्थी आत्महत्यांपैकी ५३ टक्के आत्महत्या मुलांनी केल्या होत्या. २०२१ ते २०२२ दरम्यान, मुलांच्या आत्महत्या सहा टक्क्यांनी कमी झाल्या, तर मुलींच्या आत्महत्या सात टक्क्यांनी वाढल्या. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण लोकसंख्या वाढीचा दर आणि एकूण आत्महत्येचा कल या दोन्हीपेक्षा जास्त आहे. गेल्या दशकात, ०-२४ वयोगटातील लोकसंख्या ५८२ कोटींवरून ५८१ कोटींवर घसरली, तर विद्यार्थी आत्महत्येची संख्या ६,६५४ वरून १३,०४ वर गेली आहे.

महाराष्ट्रासाठी धक्कादायक आकडेवारी

आयसी थ्री इंस्टीट्यूटच्या विद्यार्थी आत्महत्येसंदर्भातील अहवालामध्ये भारतामधील महाराष्ट्र, तामिळनाडू आणि मध्य प्रदेश ही राज्य आघाडीवर आहेत. या राज्यामध्ये आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात आहे. देशातील एकूण विद्यार्थी आत्महत्येच्या संख्येच्या एक तृतीयांश आत्महत्या या तीन राज्यांमध्ये होत असल्याचे अहवालातून समोर आलं आहे. वर्ष २०२१ आणि २०२२ मध्ये महाराष्ट्र, तमिळनाडू आणि मध्य प्रदेश या राज्यात सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. देशातील विद्यार्थ्यांच्या एकूण आत्महत्येपैकी १४ टक्के आत्महत्या महाराष्ट्रातील विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे ही अतिशय चिंताजनक बाब मानली जात आहे. याशिवाय राजस्थान या बाबतीत दहाव्या क्रमांकावर आहे. राजस्थानमधील कोटा शहरातून अनेकदा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या येत असतात.
 

Web Title: India the student death rate is higher than the population growth rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.