भारताला पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा धोका - अमेरिका

By admin | Published: May 12, 2017 11:40 AM2017-05-12T11:40:05+5:302017-05-12T11:40:05+5:30

पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटना भारत तसेच अफगाणिस्तानात हल्ला करायच्या तयारीत असल्याचा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर खात्याने दिला आहे.

India threatens Pakistan-sponsored terrorist attack - US | भारताला पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा धोका - अमेरिका

भारताला पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा धोका - अमेरिका

Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 12 - पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटना भारत तसेच अफगाणिस्तानात हल्ला करायच्या तयारीत असल्याचा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर खात्याने दिला आहे. जगभरात असलेला दहशतवाद्यांचा धोका याबद्दल अमेरिकी काँग्रेसला माहिती देताना राष्ट्रीय गुप्तचर विभागाचे संचालक डॅनियल कोट्स यांनी सांगितले की, दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यास पाकिस्तानला अपयश आले आहे. या परीसरातल्या अमेरिकेच्या हितसंबंधांना या दहशतवादी संघटनांकडून धोका असल्याचे कोट्स म्हणाले आहेत. तसेच या दहशतवादी संघटना भारत व अफगाणिस्तानात हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची आपली माहिती असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
पाकिस्तान अण्वस्त्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्याचा प्रयत्न करत आहे. अण्वस्त्रांमध्ये वाढ झाल्यास त्यांचा वापर करण्याची गरज कमी होईल असा यामागचा होरा आहे, असे कोट्स म्हणाले. दक्षिण आशियामध्ये अफगाणिस्तानातली परिस्थिती 2018 पर्यंत आणखी चिघळणार असल्याचाअंदाज कोट्स यांनी व्यक्त केला आहे. सगळ्या गुप्तचर संस्थांच्या अंदाजानुसार अफगाणिस्तानातली राजकीय व सुरक्षाविषयक स्थिती चिंताजनक आहे. अमेरिका व मित्रपक्षांनी लष्करी सहाय्यात वाढ केली तरी ही स्थिती चिंताजनक राहील असा त्यांचा अंदाज आहे.
जोपर्यंत अफगाणिस्तान तालिबानशी शांतता करार करत नाही किंवा बंडखोरी थांबवत नाही तोपर्यंत अफगाणिस्तानला परकीय लष्करी सहाय्यावर अवलंबून रहावे लागेल असे कोट्स म्हणाले. 
तालिबानमुळे अफगाणिस्तानची स्थिती नाजूक असल्याची स्थिती असल्याचे गुप्तचर संस्थांचे निरीक्षण आहे. तर पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांमुळे परिस्थिती बिकट आहे. भारताचे परराष्ट्रांशी चांगले संबंध प्रस्थापित होत असून त्यामुळे पाकिस्तानसमोर एकाकी पडण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे कोट्स यांनी म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तान चीनकडे जास्त झुकेल असेही कोट्स यांनी संसदेला सांगितले आहे. या सगळ्या स्थितीत दहशतवादी संघटना जोर धरत असून भारत व अफगाणिस्तान या दोन्ही देशांमध्ये दहशतवादी हल्ले होऊ शकतात अशी भीती कोट्स यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: India threatens Pakistan-sponsored terrorist attack - US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.