भारत आर्थिक पुनरुज्जीवनाच्या उंबरठ्यावर - शक्तिकांत दास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 08:45 AM2020-10-22T08:45:35+5:302020-10-22T08:45:40+5:30
वित्तीय संस्थांकडे वृद्धीला समर्थन देण्यासाठी पुरेसे भांडवल आहे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अनेकांनी आधीच भांडवल उभे केले आहे; तर काही नियोजन करीत आहेत. दास यांनी सांगितले की, कोविड-१९ शी लढताना भारताने वित्तीय विस्ताराचे धोरण स्वीकारले.
नवी दिल्ली :भारत आर्थिक पुनरुज्जीवनाच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले आहे. कोविड-१९ महामारीमुळे बसलेल्या धक्क्यातून अर्थव्यवस्था सावरत असल्याच्या पार्श्वभूमीवर दास यांनी हे वक्तव्य केले आहे.
वित्तीय आयोगाचे चेअरमन एन.के. सिंग यांनी लिहिलेल्या ‘पोर्ट्रेट ऑफ पॉवर : हाफ अ सेंच्युरी बीइंग अॅट रिंगसाईड’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी दास यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँक व सरकारकडून समावेशी (अॅकामॉडेटिव्ह) पतधोरण आणि वित्तीय धोरण स्वीकारण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर आपण आता आर्थिक पुनरुज्जीवन प्रक्रियेच्या ऐन उंबरठ्यावर उभे आहोत.
वित्तीय संस्थांकडे वृद्धीला समर्थन देण्यासाठी पुरेसे भांडवल आहे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अनेकांनी आधीच भांडवल उभे केले आहे; तर काही नियोजन करीत आहेत. दास यांनी सांगितले की, कोविड-१९ शी लढताना भारताने वित्तीय विस्ताराचे धोरण स्वीकारले. कोविडपश्चात काळात देशाने वाटचाल करावी यासाठी सरकारने वित्तीय नकाशा (रोडमॅप) तयार करावा. या संदर्भात अधिक तपशीलवार माहिती त्यांनी यावेळी दिली.