भारत अमेरिकेचा खराखुरा मित्र, भागीदार
By admin | Published: January 26, 2017 01:30 AM2017-01-26T01:30:51+5:302017-01-26T01:30:51+5:30
अमेरिका भारताला ‘खराखुरा मित्र आणि भागीदार’ समजतो, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मंगळवारी रात्री दूरध्वनीवर बोलताना म्हटले.
वॉशिंग्टन/नवी दिल्ली : अमेरिका भारताला ‘खराखुरा मित्र आणि भागीदार’ समजतो, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मंगळवारी रात्री दूरध्वनीवर बोलताना म्हटले.
जागतिक दहशतवादाविरोधात आम्ही एकमेकांच्या खांद्यालाखांदा लावून लढायचा निर्धार केला आहे आणि दोन्ही देशांनी संरक्षण आणि सुरक्षेसाठी एकत्रित काम करायचे ठरवले आहे, असे ट्रम्प म्हणाले.
रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याआधी ट्रम्प यांनी भारतीय पंतप्रधानांशी दूरध्वनी करून, त्यांच्याशी चर्चा करणे, हे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.
ट्रम्प यांनी निवडणूक काळातील भाषणांमध्येही मोदी यांचे खूप कौतुक केले होते. नोकरशाहतील तसेच व्यापारविषयक कायद्यात केलेल्या सुधारणा यांचा ट्रम्प यांनी प्रामुख्याने उल्लेख केला होता. (वृत्तसंस्था)