माइक पॉम्पियो नवी दिल्लीत, भारत-अमेरिकेदरम्यान मोठी बैठक; चीनचं लागलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 02:50 PM2020-10-26T14:50:04+5:302020-10-26T14:51:30+5:30
भारत आणि अमेरिकेदरम्यान होणारी ही बैठक मंगळवारी सुरू होईल. मात्र, त्यापूर्वी सोमवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. ही बैठक हैदराबाद हाऊस येथे होईल.
नवी दिल्ली -चीनबरोबर सुरू असलेला सीमा वाद आणि अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक, अशा परिस्थितीत भारत आणि अमेरिका यांच्यात एक महत्वाची बैटक होत आहे. अमेरिकन परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो आणि संरक्षणमंत्री मार्क एस्पर सोमवारी दिल्ली येथे पोहोचले. ते परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याबरोबर 2+2 बैठकीत भाग घेतील.
भारत आणि अमेरिकेदरम्यान होणारी ही बैठक मंगळवारी सुरू होईल. मात्र, त्यापूर्वी सोमवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. ही बैठक हैदराबाद हाऊस येथे होईल. यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, माइक पॉम्पियो यांच्यासोबत बैठक करतील. या बैठकीनंतर सायंकाळी डिनरचेही आयोजन करण्यात येणार आहे.
दोन्ही देशांदरम्यान होणाऱ्या या बैठकीवर चीनचेही बारीक लक्ष आहे. एवढेच नाही, तर चिनी माध्यमाने नुकतेच म्हटले होते, की अमेरिका आणि फ्रान्स यांचे संबंध जसे आहेत, तसे संबंध भारत आणि अमेरिकेचे होऊ शकणार नाहीत. चीनच्या ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे, की अमेरिकन मंत्री एकाच वेळी अनेक देशांचा दौरा करत आहेत. यावरून, अमेरिका भारताला इतर देशांप्रमाणेच समजतो, हे स्पष्ट होते. त्यामुळे या बैठकीचा विशेष असा परिणाम होणार नाही.
मंगळवारी खरी चर्चा -
अमेरिकेचे परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री मंगळवारी नवी दिल्ली येथे वॉर मेमोरियलचा दौरा करतील आणि श्रद्धांजली देतील. यानंतर हैदराबाद हाऊसमध्ये 2+2 बैठक सुरू होईल. या बैठकीत बेसिक एक्सचेंज तसेच कॉर्पोरेशन अॅग्रीमेंटवर शिक्कामोर्तब होऊ शकते. यानंतर अमेरिका भारताबरोबर अनेक महत्वपूर्ण गोष्टी शेअर करेल. यात सॅटेलाईटसह इतर सैनिकी माहितीचाही समावेश आहे. याशिवाय स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय राजकीय तथा सैन्य विषयक वातावरणावरही चर्चा होईल.
हे दोन्ही नेते पंतप्रधान मोदींचीही भेट घेणार आहेत. यानंतर भारत-अमेरिकेकडून शेअर करण्यात आलेली माहितीही जाहीर केली जाईल. चीनबरोबर सुरू असलेल्या तणावात अमेरिका अनेक वेळा भारताबरोबर उभा राहिला आहे. तसेच चीनवर परिस्थिती बिघडवण्याचाही आरोप केला आहे.