इंडिया वि. भारत, कोणते नाव हवे? सर्व्हे आला, ५० टक्के लोकांनी हे मत नोंदविले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 08:56 PM2023-09-16T20:56:23+5:302023-09-16T20:56:41+5:30
G20 परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेनंतर हा देशाच्या नावाचा वाद सुरु झाला होता. G20 शिखर परिषदेत सहभागी झालेल्या पाहुण्यांना राष्ट्रपतींनी पाठवलेल्या गाला डिनरच्या निमंत्रण पत्रात त्यांना 'भारताचे राष्ट्रपती' असे संबोधण्यात आले होते.
इंडिया विरुद्ध भारत नावबदलाचा वाद गेल्या काही दिवसांपूर्वी सुरु झाला होता. आता यावर देशाचा मूड काय आहे, याचा सर्व्हे आला आहे. सी वोटर आणि इंडिया टुडेने केलेल्या सर्व्हेत बहुतांश लोकांना इंडिया हे नाव तसेच हवे आहे. म्हणजेच त्यांचा इंडिया हे नाव काढून टाकण्यास विरोध आहे.
घटनेतून इंडिया हा शब्द काढावा का? या प्रश्नावर 35.7 टक्के लोकांनी हो असे उत्तर दिले. त्याचवेळी ५०.७ टक्के लोकांनी संविधानातून 'इंडिया' हा शब्द काढू नये, असे म्हटले आहे. तर 13.6 टक्के लोकांनी याबाबत काहीही सांगू शकत नसल्याचे सांगितले.
देशाचे नाव काय असावे असे विचारले असता? 11 टक्के लोकांनी 'इंडिया'च्या बाजूने मत टाकले. 50 टक्के लोकांनी देशाचे नाव 'भारत' असायला हवे, असे म्हटले आहे. तर 38.6 टक्के लोकांनी राज्यघटनेतील सध्याच्या व्यवस्थेनुसार दोन्ही असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
I.N.D.I.A आघाडीमुळे भारत हा शब्द काढून टाकण्याचा प्रयत्न झाला का? असाही प्रश्न विचारण्यात आला. 34.2 टक्के लोकांनी 'हो' असे उत्तर दिले. 41.7 टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले. 24.1 टक्के लोकांनी काहीच उत्तर दिले नाही.
G20 परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेनंतर हा देशाच्या नावाचा वाद सुरु झाला होता. G20 शिखर परिषदेत सहभागी झालेल्या पाहुण्यांना राष्ट्रपतींनी पाठवलेल्या गाला डिनरच्या निमंत्रण पत्रात त्यांना 'भारताचे राष्ट्रपती' असे संबोधण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावापुढेही 'भारत' हा शब्द दिसत होता. यावरून मोदी इंडिया हे नाव बदलतात की काय अशी चर्चा सुरु झाली होती. े