लडाखमधील तणाव संपवण्याची इच्छा असेल तर...; भारताची चीनसमोर '10 हजारी' अट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 05:10 PM2020-06-10T17:10:27+5:302020-06-10T17:16:22+5:30

पूर्व लडाखमधून भारत आणि चीनच्या सैन्याची अडीच किलोमीटरपर्यंत माघार

India Wants China To De Induct All Troops With Artillery And Tanks From Ladakh Border | लडाखमधील तणाव संपवण्याची इच्छा असेल तर...; भारताची चीनसमोर '10 हजारी' अट

लडाखमधील तणाव संपवण्याची इच्छा असेल तर...; भारताची चीनसमोर '10 हजारी' अट

Next

नवी दिल्ली: पूर्व लडाखमधील सीमावर्ती भागातील सैनिक काल भारत आणि चीननं मागे घेतले. चिनी सैन्य अडीच किलोमीटरपर्यंत मागे सरकल्यानंतर भारतीय जवानांनीदेखील मागे वळण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता भारतानं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) तणाव पूर्णपणे निवळण्यासाठी चीनसमोर मोठी आणि महत्त्वाची अट ठेवली आहे. चीननं त्यांचं सर्व सैन्य आणि युद्धसाहित्य मागे घ्यावं, अशी मागणी भारतानं केली आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. चीननं सीमावर्ती भागाजवळ तोफा आणि रनगाडे तैनात केले आहेत. 

काल दोन्ही देशांच्या सैन्यांनी पूर्व लडाखमधून माघार घेतली. या पार्श्वभूमीवर आज दोन्ही देशांमध्ये मेजर जनरल स्तरावरील बैठक होणार आहे. याआधी ६ जूनला दोन्ही देशांमध्ये कमांडर स्तरावरील अधिकाऱ्यांची बैठक झाली. याचा सकारात्मक परिणाम लगेच दिसून आला. दोन्ही देशांच्या सैन्यानं पूर्व लडाख भागातून मागे सरकण्याचा निर्णय घेतला. गलवान (पेट्रोलिंग पॉईंट १४ आणि १५), हॉट स्प्रिंग (पेट्रोलिंग पॉईंट १७) भागांतून दोन्ही देशांचे जवान माघारी फिरले. चिनी सैन्यानं अडीच किलोमीटरपर्यंत माघार घेतली. 

भारताचं जशास तसं प्रत्युत्तर
'पूर्व लडाखमधून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र चीननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात केलेले एक डिव्हिजनपेक्षा जास्त सैनिक (१० हजारपेक्षा जास्त) मागे घ्यावेत. आता घेण्यात आलेली माघार ठीक आहे. मात्र चीननं मोठ्या प्रमाणात तैनात केलेले जवान माघारी बोलावल्याशिवाय तणाव दूर होणार नाही,' अशी भूमिका भारतानं घेतल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. चीननं लडाखमध्ये १० हजार सैनिक तैनात केल्यानं भारतानंही या भागात १० हजार जवान तैनात केले आहेत. 

१० दिवस संवाद सुरू राहणार
चिनी सैन्यामुळे ४ मार्चला लडाखमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. पीपल्स लिबरेशन आर्मीची एका बटालियन त्यांच्या पेट्रोलिंग पॉईंटपासून पुढे गेली. त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा साठा आणि वाहनं होती. पुढील १० दिवस दोन देशांमध्ये चालणाऱ्या बैठकांमध्ये भारत हा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. भारत आणि चीनमध्ये बटालियन, ब्रिगेड आणि मेजर जनरल स्तरावरील बैठक होणार आहे. 

चिनी सैन्याची माघार, पण जिनपिंग यांचा स्टार कमांडर सीमेवर तैनात

भित्रा पाकिस्तान! अफवा पसरली, 'अज्ञात विमाने हवेत उडाली'; अख्ख्या कराचीची वीज घालवली

अभिमानस्पद! युरोपीय देशांपेक्षा भारतीय सैन्याची ताकद जास्त; चीननं पहिल्यांदाच केलं कौतुक

Web Title: India Wants China To De Induct All Troops With Artillery And Tanks From Ladakh Border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.