‘भारत हा कधीच देश नव्हता, द्रमुक नेत्याचा व्हिडीओ चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 10:28 AM2024-03-06T10:28:09+5:302024-03-06T10:31:14+5:30

२९ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडूतील इस्रोच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानिमित्त राज्य सरकारकडून वृत्तपत्रात देण्यात आलेल्या जाहिरातीत पंतप्रधानांच्या मागे दाखविण्यात आलेल्या रॉकेटवर चीनचा राष्ट्रध्वज दिसत होता. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर स्टॅलिन सरकारची सोशल मीडियावर खिल्ली उडविण्यात आली. 

India was never a country, DMK leader's video in discussion | ‘भारत हा कधीच देश नव्हता, द्रमुक नेत्याचा व्हिडीओ चर्चेत

‘भारत हा कधीच देश नव्हता, द्रमुक नेत्याचा व्हिडीओ चर्चेत

त्यांच्या विधानाचा भाजपसहित अन्य पक्षांनी तीव्र निषेध केला आहे. विद्वेष पसरविणारे वक्तव्य केल्याबद्दल ए. राजा यांना अटक करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. ‘द्रमुक’चा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने देखील ए. राजा यांच्या विधानाचा निषेध केला आहे. कोणाही व्यक्तीने बोलताना संयम राखला पाहिजे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

याआधी ए. राजा यांनी रामायण व भगवान श्रीराम यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांवरूनही वादंग निर्माण झाले होते. द्रमुकचे नेते ए. राजा यांचा पक्षाच्या सभेत भाषण करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, भारत हा कधीच एक देश म्हणून आकाराला आला नव्हता. एक देश म्हणजे एक भाषा, एक संस्कृती व एकच परंपरा तिथे प्रचलित असणे अपेक्षित असते; पण भारतामध्ये असे वातावरण कधीच नव्हते. तिथे विविध संस्कृती नांदत होत्या. ए. राजा यांनी आणखीही वादग्रस्त विधाने केली.

 काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, ए. राजा यांच्या विधानांशी काँग्रेस पक्ष १०० टक्के असहमत आहे. या विधानांचा काँग्रेस पक्ष निषेध करतो.

Web Title: India was never a country, DMK leader's video in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.