'हा नवीन भारत आहे, ज्याठिकाणी आडनावाला नाही तर तरूणांच्या क्षमतेला महत्व आहे' 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 01:36 PM2019-08-30T13:36:58+5:302019-08-30T13:37:40+5:30

अनेक वर्षांपासून अशी संस्कृती बनली होती ज्यात सरनेम आणि संपर्क या आधारे तरूणांना संधी दिली जात होती.

"This is an India where the surnames of the youth do not matter Says PM Narendra Modi | 'हा नवीन भारत आहे, ज्याठिकाणी आडनावाला नाही तर तरूणांच्या क्षमतेला महत्व आहे' 

'हा नवीन भारत आहे, ज्याठिकाणी आडनावाला नाही तर तरूणांच्या क्षमतेला महत्व आहे' 

Next

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले की, हा नवा भारत आहे. यात आडनावाला महत्व नाही तर आपलं नाव बनविण्याची क्षमता ठेवणार तरूण क्षमता ठेवतात. भारतात अनेक गोष्टी बदलत आहेत. यात भ्रष्टाचाराला थारा दिला जात नाही. लोकांमध्ये आणि प्रशासनात संवाद असणे गरजेचे आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले आहे.

मनोरमाच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्याला प्रत्येक गोष्टीत सहमती घेण्याची आवश्यकता नाही पण सार्वजनिक जीवनात वावरताना विविध विचारधारांच्या माणसांचे ऐकले पाहिजे. आम्ही अनेक गोष्टी बदलल्या आहेत. स्टार्टअपच्या माध्यमातून सुरु होणारी अर्थव्यवस्था नव्या भारताच्या दृष्टीकोनातून पाहिली पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

अनेक वर्षांपासून अशी संस्कृती बनली होती ज्यात सरनेम आणि संपर्क या आधारे तरूणांना संधी दिली जात होती. त्यांना अनेकांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. तरूणांचे यश मोठं शहर, मोठी संस्थाने अथवा मोठ्या परिवारातून आला असेल यावर निर्भर होते. मात्र आता ही परिस्थिती बदलली आहे. तरूणांसाठी विविध दारे उघडली आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. 

तसेच भारत सध्या अशा क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहे ज्याठिकाणी आम्हाला याआधी पोहचणं कठीण जात होते. स्टार्टअप असो वा क्रीडा. लहान लहान शहरातील युवाही जे कोणत्याही वशिल्याशिवाय पुढे जात आहे. ज्यांच्याकडे स्वप्न आहेत त्यांना उडण्याचे बळ मिळत आहेत. ते त्यांच्या कतृत्वावर यशाचं शिखर गाठत आहे. भारताचं नाव उंचावत आहेत. हे नवीन भारताचं यश आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

भारत हा एकमेव देश आहे ज्याठिकाणी विविध भाषा बोलल्या जातात. मग आपण या भाषांचा उपयोग करत एकता आणण्याचं काम करू शकत नाही का? वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांना एकत्र आणण्याचं काम मीडिया करू शकत नाही का? हे कठीण नाही जितकं दाखविले जाते. आज लोक म्हणतात की, आम्ही स्वच्छ भारत बनविणार, आम्ही भारताला भ्रष्टाचारमुक्त बनविणार, आम्ही सुशासन आणणार, हे सगळं शक्य झालं कारण यासाठी इच्छाशक्ती हवी आहे असं नरेंद्र मोदींनी सांगितले.  
 

Web Title: "This is an India where the surnames of the youth do not matter Says PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.