...येत्या चार वर्षात भारत बनणार जगातील सर्वात शक्तिशाली देश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 12:03 PM2019-04-04T12:03:39+5:302019-04-04T12:08:02+5:30
ध्वनीच्या पाचपट क्षमतेने वेगवान मारा करणारी हायपरसोनिक क्रूज मिसाईल पुढील 4 वर्षात डीआरडीओ भारतात तयार करणार आहे. आतापर्यंत जगात कोणत्याही देशाकडे अशी मिसाईल नाही.
नवी दिल्ली - ध्वनीच्या पाचपट क्षमतेने वेगवान मारा करणारी हायपरसोनिक क्रूज मिसाईल पुढील 4 वर्षात डीआरडीओभारतात तयार करणार आहे. आतापर्यंत जगात कोणत्याही देशाकडे अशी मिसाईल नाही. भारतासोबतअमेरिका, चीन आणि रशिया हे तीन देशही हायपरसोनिक मिसाईलवर काम करत आहेत. डीएमएसआरडीईच्या आयोजित कार्यक्रमात वैज्ञानिक परिसंवादादरम्यान डीआरडीओचे महानिर्देशक डॉ. एस. वी कामत यांनी ही माहिती दिली.
डॉ. कामत यांनी सांगितले की, डीआरडीओ 7 विभागात कार्यरत आहे. भविष्यात देशाच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक असणाऱ्या हायपरसोनिक मिसाईलवर काम डीआरडीओकडून प्रगतीपथावर आहे. ध्वनीवेगाच्या 5 पट अधिक क्षमतेने हायपरसोनिक मिसाईल काम करणार आहे. सध्या याच्या मटेरियलवर काम सुरु आहे. 1500 डिग्री सेल्सिअस तापमानातदेखील ही मिसाइल सहजरित्या काम करु शकेल. सोबतच या मिसाईलचं वजन हलकं असल्याने हवेच्या दाबामध्येही शत्रूवर मारा करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.
काय असणार वैशिष्टे?
ध्वनी क्षमतेच्या पाचपटीने अधिक वेग
आत्तापर्यंत कोणत्याच देशाकडे असं मिसाईल नाही
1500 डिग्री सेल्सिअस तापमान सहन करण्याची शक्ती
शत्रूंच्या पाणबुड्यांचा शोध घेण्यासाठी 'सोनार' तयार
नौदलाची ताकद वाढविण्यासाठी नवीन सोनार यंत्रणा तयार करण्याचं काम सुरु आहे. सध्या समुद्राची खोल पाण्यामध्ये शत्रूच्या पाणबुड्या रडारवर घेण्यासाठी कोणतीच यंत्रणा काम करत नाही. त्यामुळे सोनार यंत्रणेद्वारे शत्रूच्या पाणबुड्यांवर नजर ठेवता येणार आहे. कारण पाणबुड्यांची ओळख फक्त त्याच्या आवाजावरुन केली जाते. सोनार यंत्रणा शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध त्याच्या इंजिनच्या आवाजावर ओळखू शकणार आहे.
टारपीडो तयार करण्याच्या दृष्टीने पाऊलं
जगातील फक्त पाच देशांकडे टारपीडो बनविण्याची क्षमता आहे मात्र भारत आता या पाच देशांच्या यादीत दाखल झाला आहे. टारपीडो म्हणजे समुद्राच्या खोल पातळीमध्ये पाणबुड्यांना उद्धवस्त करणारी हायटेक मिसाईल आहे. पाण्याच्या आतमध्ये कोणतीही बंदूक आणि बॉम्ब काम करत नाही. टारपीडोची मारक क्षमता आणि ताकद त्याच्या बॅटरीवर होते. लीथियम आयनची बॅटरीची क्षमता 10 सी असते. मोठ्या मोठ्या वाहनांच्या बॅटरीची ताकद 1 सी असते त्यावरुन अंदाज घेऊ शकता की, टारपीडोच्या बॅटरीची ताकद कित्येक पटीने अधिक असते.