भारत अमेरिकेविरोधात WTOमध्ये 16 केस दाखल करणार
By admin | Published: May 11, 2016 08:42 PM2016-05-11T20:42:59+5:302016-05-11T21:25:56+5:30
भारत जागतिक व्यापार संघटनेत अमेरिकेविरोधात 16 केस दाखल करणार आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11- भारत जागतिक व्यापार संघटनेत अमेरिकेविरोधात 16 केस दाखल करणार आहे. अक्षय ऊर्जा क्षेत्रात अमेरिकेनं काही कार्यक्रम जागतिक नियमांचं उल्लंघन करून केले आहेत. संसदेत बुधवारी केंद्र सरकारकडून ही माहिती देण्यात आली.
या वृत्ताला राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांनीही दुजोरा दिला आहे. अमेरिकेनं जागतिक नियमांचं उल्लंघन केल्यानं भारत जागतिक व्यापार संघटनेत जाणार असून, 16 केस दाखल करणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे.
भारताला अमेरिकेनं अक्षय ऊर्जा क्षेत्रात काही कार्यक्रम जागतिक नियमांचं उल्लंघन करून केल्याचं वाटतं आहे. विशेष करून जीएटीटी 1994च्या कायद्याच्या नियमांचा उल्लंघन केल्याचा आक्षेप आहे. भारतानं या प्रकरणात पॅनलचा अहवाल आणि शिफारशींवरूनच WTOमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं यावेळी निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.