बोफोर्सनंतर तीन दशकांनी भारताला मिळणार नव्या तोफा

By admin | Published: May 18, 2017 10:00 AM2017-05-18T10:00:10+5:302017-05-18T10:20:41+5:30

बोफोर्स तोफा खरेदी व्यवहारानंतर तब्बल तीन दशकांनी भारतीय लष्कराला नव्या तोफा मिळाल्या आहेत.

India will get new guns after three decades after Bofors | बोफोर्सनंतर तीन दशकांनी भारताला मिळणार नव्या तोफा

बोफोर्सनंतर तीन दशकांनी भारताला मिळणार नव्या तोफा

Next

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 18 - बोफोर्स तोफा खरेदी व्यवहारानंतर तब्बल तीन दशकांनी भारतीय लष्कराला नव्या तोफा मिळाल्या आहेत. बीएई सिस्टिम या अमेरिकन कंपनीकडून 155MM/39 कॅलिबर अल्ट्रा लाईट हॉवित्झर तोफा  भारतात दाखल झाल्या आहेत. आज राजस्थानातील पोखरण तळावर या तोफाची चाचणी होणार आहे. केंद्र सरकारने 2010 मध्ये अमेरिकेबरोबर एम 777 तोफाच्या खरेदीसाठी बोलणी सुरु केली होती. 
 
मागच्यावर्षी 26 जूनला सरकारने 145 तोफा खरेदी करणार असल्याचे जाहीर केले. तोफांचा हा सौदा विदेशी सैन्य विक्री (एफएमएस)द्वारे होणार आहे; पण सुटे भाग, दुरुस्ती आणि दारूगोळा यांचे परिचालन भारतीय प्रणालीद्वारे होईल, असे संरक्षण सूत्रांनी सांगितले. मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात 2900 कोटी रुपयांच्या या खरेदी व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण झाली. 80 च्या दशकात स्वीडन बरोबर झालेल्या बोफोर्स तोफा खरेदीच्या व्यवहारानंतर प्रथमच भारतीय लष्कराला अत्याधुनिक तोफा मिळणार आहेत. त्यावेळी बोफोर्स तोफांच्या खरेदी व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाले होते. 
 
तोफा खरेदी करताना सरकारने स्वदेशी निर्मितीला प्राधान्य दिले असून, 2020 पर्यंत 3503 तोफांनी सुसज्ज राहण्याचे लक्ष्य आहे. भारतीय वातावरणात भारताच्या गरजेनुसार या तोफांची निर्मिती करण्यात आली आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडीयन लष्करात या तोफा सामाविष्ट असून, इराक आणि अफगाणिस्तानमध्ये या तोफेचा वापर केला आहे. 
 
155MM/39 कॅलिबर अल्ट्रा लाईट हॉवित्झर तोफानंतर सप्टेंबर 2018 मध्ये M777 भारतात येईल. त्याचा वापर प्रशिक्षणासाठी करण्यात येणार आहे. त्यानंतर मार्च 2019 ते जून 2021 या कालावधील दर महिन्याला पाच तोफा लष्करात दाखल होतील. 24 ते 40 किमीपर्यंत मारा करण्याची या तोफांची क्षमता आहे. हॉवित्झर तोफांच्या पुरवठ्यासाठी बीएई सिस्टिम्सने महिंद्राशी भागीदारी केली आहे. 
 
145 पैकी 120 तोफा थेट दाखल होतील. उर्वरित 120 तोफांची बांधणी भारतात केली जाईल. प्रत्यक्ष लढाईत डोंगराळ भागात या तोफा उपयुक्त ठरतील. कारगिल युद्धाच्यावेळी बोफोर्स तोफांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली होती. बीएई सिस्टिमने देशात एम ७७७ अल्ट्रा लाईटवेट हॅवित्झरसाठी प्रस्तावित असेंब्ली, एकीकरण आणि परीक्षण सुविधेसाठी (एआयटी) महिंद्राला आपला भागीदार म्हणून निवडले आहे.
 

Web Title: India will get new guns after three decades after Bofors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.