पाकिस्तानातून येणाऱ्या मुस्लिमांनाही देणार भारताचं नागरिकत्व - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 08:22 AM2020-01-31T08:22:51+5:302020-01-31T08:29:39+5:30
भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. येथे कोणावरही धार्मिक अत्याचार होऊ शकत नाही
नवी दिल्ली - संपूर्ण देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलनाचं रान पेटलं आहे. अशातच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोठं विधान केलं आहे. जर एखादा मुस्लीम पाकिस्तानातून आला तर त्याला नागरिकत्व दिले जाईल. यासाठी कायद्यात तरतूददेखील आहे असं ते म्हणाले.
निवडणूक प्रचार रॅलीत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, सरकारने गेल्या ५ ते ६ वर्षात ६०० पाकिस्तानी नागरिकांना भारताचं नागरिकत्व दिलं आहे. तसेच सीएएच्या विरोधामागील आंदोलनात परदेशी शक्तींचा हात असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
आम्ही हिंदू-मुस्लिमांच्या जोरावर राजकारण करणारे लोक नाही. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे इस्लामी देश आहेत.
#WATCH Defence Min Rajnath Singh:...If any Muslim brother from Pakistan wants to come to India&stay here,then we have a provision in our citizenship act to give them Indian citizenship.We gave citizenship to 600 Pakistanis in last 5-6 yrs.Still attempts are made to stoke violence pic.twitter.com/v4K11fJQYE
— ANI (@ANI) January 30, 2020
पण भारत हा हिंदू देश नाही. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. येथे कोणावरही धार्मिक अत्याचार होऊ शकत नाही. पाकिस्तानमध्ये बिगर मुस्लीम लोकांवर धार्मिक अत्याचार होतात, म्हणून आम्हाला हा कायदा करण्याची आवश्यकता होती. मग ते हिंदू, बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन आणि पारशी असतील, तिथे त्यांच्यावर धार्मिक अत्याचार केले जात आहे आणि भारतात त्यांना सन्मानाने जीवन जगण्याची इच्छा आहे. मग आपण त्यांना नागरिकत्व देऊ. या कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसेची विचारसरणी एकच, राहुल गांधींचा घणाघात
मुस्लिमांनाही नागरिकत्वाची तरतूद
मुस्लीम समाजाचा प्रश्न आहे. जर कोणताही मुस्लीम बांधव ज्याला पाकिस्तानातून यायचे असेल, भारतात राहायचे असेल तर त्यांना आमच्या नागरिकत्व कायद्यात तरतूद आहे की त्यांना येथे नागरिकत्व मिळू शकेल. आम्ही आमच्या ६०० मुस्लिम बांधवांना जे पाकिस्तानातून आले आहेत त्यांना ५ ते ६ वर्षांत भारताचं नागरिकत्व दिले आहे. तरीही द्वेष भडकावण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात आहे असा आरोप राजनाथ सिंह यांनी केला.
परदेशी शक्तींचा हात
सीएएमुळे कोणत्याही भारतीयाचं नागरिकत्व जाणार नाही, अशी ग्वाही राजनाथ सिंह यांनी दिली. सीएएच्या विरोधामागील परदेशी शक्तींचा हात असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. राजनाथ सिंह म्हणाले की, भारतातील एकाही नागरिकाचे नागरिकत्व जाणार नाही. केवळ दिशाभूल केली जात आहे. यामध्ये काही परदेशी शक्तींचा सहभाग आहे. इतिहास द्वेषाच्या शाईने लिहिण्याचा प्रयत्न करू नये असा इशाराही संरक्षणमंत्र्यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
Jamia Protest: मोदीजी, 'त्याला' त्याच्या कपड्यांवरुन ओळखा; ओवेसींचा चिमटा
Jamia Protest: शाहीन बाग, खेल खत्म; त्यानं फेसबुकवर दिले होते गोळीबाराचे संकेत
Jamia Firing : आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याआधी 'तो' होता फेसबुकवर LIVE
'तुम्ही अयोध्येत राम मंदिर बांधा, आम्ही बाबरी मशीद उभारू'
देश तोडण्याची भाषा करणारा शरजील 'प्रेयसी'मुळे फसला जाळ्यात; 'असा' आखला पोलिसांनी प्लॅन