भारताकडून भूतानला ४,५०० कोटी जलविद्युत निर्मितीबाबत सहकार्य वाढविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 05:07 AM2018-12-29T05:07:23+5:302018-12-29T05:07:56+5:30
भारताने भूतानला त्या देशाच्या बाराव्या पंचवार्षिक योजनेसाठी ४,५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भूतानचे पंतप्रधान लोते त्शेरिंग यांच्यात शुक्रवारी झालेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली.
नवी दिल्ली : भारतानेभूतानला त्या देशाच्या बाराव्या पंचवार्षिक योजनेसाठी ४,५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भूतानचे पंतप्रधान लोते त्शेरिंग यांच्यात शुक्रवारी झालेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली.
जलविद्युत निर्मितीबाबत सहकार्य वाढविण्यासंदर्भात दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली. त्यानुसार मंगडेच्चू जलविद्युत प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.
लोते त्शेरिंग हे गुरुवारी भारत भेटीवर आले. भूतानमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत विजय मिळविल्यानंतर त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे.
विश्वासू मित्र -मोदी
भारताचा विश्वासू मित्र भूतानच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडू, असे आश्वासन मोदी यांनी दिले आहे. यंदा सुरू झालेल्या भूतानच्या १२ व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी २०२२ पर्यंत आहे. मोदींशी चर्चा करण्याआधी भूतानचे पंतप्रधान लोते त्शेरिंग यांची परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही भेट घेतली. त्शेरिंग यांनी महात्मा गांधी यांना राजघाटावरील स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केले.