कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी आता भारत तयार करणार हा 'सूट'; डॉक्टरांची बनेल 'ढाल'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 05:32 PM2020-03-27T17:32:10+5:302020-03-27T17:46:04+5:30

जग भरातील अनेक देशांत या सूटचा वापर केला जात आहे. इबोला असो अथवा कोरोना, जेव्हा-जव्हा जगात व्हायरसचा हल्ला होतो, तेव्हा-तेव्हा हा सूट डॉक्टर, नर्सेस आणि गरजवंतांसाठी 'संरक्षण कवच' बनतो.

India will indigenously manufacture hazmat suits for healthcare worker and frontline warriors combating corona virus sna | कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी आता भारत तयार करणार हा 'सूट'; डॉक्टरांची बनेल 'ढाल'

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी आता भारत तयार करणार हा 'सूट'; डॉक्टरांची बनेल 'ढाल'

Next
ठळक मुद्देरशियाचे राष्‍ट्रपती व्लादिमीर पुत‍ीन यांनीही परिधान केला आहे हा सूट कोरोनापासून बचावासाठी जग भरातील अनेक देश करतायेत या सूटचा वापर हा सूट परिधान करण्याचे जगभरात वेगवेगळे प्रोटोकॉल्स आहेत.

नवी दिल्ली - कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. आतापर्यंत या व्हायरसने जगभरात हजारो लोकांचे बळी घेतले आहेत. तर लाखो लोकांना याची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता संपूर्ण जग कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी संरक्षण कवच तयार करण्याच्या कामात लागले आहे. 

या संरक्षण कवचाचे नाव आहे 'हजमत सूट'. आता भारतही स्वदेशी तत्वावर या सूटची निर्मिती करणार आहे. जगभरातील अनेक देशांत या सूटचा वापर केला जात आहे. इबोला असो अथवा कोरोना, जेव्हा-जव्हा जगात व्हायरसचा हल्ला होतो, तेव्हा-तेव्हा हा हजमत सूट डॉक्टर, नर्सेस आणि गरजवंतांसाठी 'संरक्षण कवच' बनतो. यामुळे डॉक्‍टर आणि नर्सेसना किलर व्हायरसपासून स्वतःचा बचाव करत रुग्णांवर उपचार करणे सहज शक्य होते. रशियाचे राष्‍ट्रपती व्लादिमीर पुत‍ीन यांनीही बुधवारी हाच सूट परिधान करून कोरोना पीडितांची पाहणी केली.

यामुळे या सूटला म्हणले जाते 'हजमत सूट' -

'हजमत सूट' हे हेजार्डस मटेरियल सूटचे संक्षिप्‍त नाव आहे. या सूटने संपूर्ण शरीर झाकता येते. हा सूट घातक पदार्थ, रसायने आणि जैविक धोकादायक गोष्टींपासून परिधान करणाऱ्या व्यक्तीचे संरक्षण करतो. हा सूट पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंटचेच (PPE) एक रूप आहे. हा सूट डॉक्‍टर मंडळी रुग्णांवर उपचार करतानाच परिधान करतात. या सोबत चश्‍मा, ग्‍लोज आणि गाऊन परिधान केला जातो.

सूट परिधान करण्यासठी आहेत वेगवेगळे प्रोटोकॉल -

हजमत सूट परिधान करण्याचे जगभरात वेगवेगळे प्रोटोकॉल आहेत. यावेळी व्हायरस अथवा एखादा आजार पसरूनये याचीही काळजी घेतली जाते. हा सूट तयार करताना कुठलाही व्हायरस अथवा धोकादायक पदार्थ यात शिरकाव करणार नाही, याची काळजी घेतली जाते. यापूर्वी इबोला संक्रमणाच्या वेळीही हा सूट परिधान करणे बंधनकारक करण्यात आले होते. 

जगभरात 22 हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. देशात गुरुवारी (26 मार्च) एका दिवसात तब्बल सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आता देशभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 20 वर पोहोचला आहे. तर 700 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे जगभरात 22 हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला 

Web Title: India will indigenously manufacture hazmat suits for healthcare worker and frontline warriors combating corona virus sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.