चीन जोवर सैनिकांची संख्या कमी करणार नाही, तोवर भारतही करणार नाही; संरक्षणमंत्र्यांचं रोखठोक उत्तर

By जयदीप दाभोळकर | Published: January 23, 2021 10:18 AM2021-01-23T10:18:28+5:302021-01-23T10:20:38+5:30

चीननं भारताचा विश्वास तोडला यात शंका नाही, राजनाथ सिंह यांचं वक्तव्य

India will not reduce troops unless China initiates process defence minister Rajnath Singh in interview | चीन जोवर सैनिकांची संख्या कमी करणार नाही, तोवर भारतही करणार नाही; संरक्षणमंत्र्यांचं रोखठोक उत्तर

चीन जोवर सैनिकांची संख्या कमी करणार नाही, तोवर भारतही करणार नाही; संरक्षणमंत्र्यांचं रोखठोक उत्तर

Next
ठळक मुद्देचीननं भारताचा विश्वास तोडला यात शंका नाही, राजनाथ सिंह यांचं वक्तव्यचर्चेतून तोडगा निघण्याचा सिंह यांचा विश्वास

जोवर चीन सीमेवर आपल्या सैनिकांची संख्या कमी करणार नाही तोवर भारतही आपल्या सैनिकांची संख्या कमी करणार नाही, असं रोखठोक उत्तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलं. यावेळी त्यांनी भारत-चीनदरम्यान असलेल्या वादावर चर्चेतून तोडगा काढता येऊ शकतो असा विश्वासही व्यक्त केला. भारत आपल्या सीमाक्षेत्रात तेजीनं पायाभूत सुविधांचा विकास करत आहे आणि चीननं काही योजनांवर आक्षेपही घेतला असल्याचं सिंह म्हणाले. 

"जोवर चीन आपल्या सैनिकांची संख्या कमी करत नाही. तोवर भारतही आपल्या सैनिकांची संख्या कमी करण्याची प्रक्रिया सुरू करणार नाही," असं राजनाथ सिंह म्हणाले. त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केलं. "सध्या सुरू असलेल्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी कोणती वेळेची मर्यादा ठरवण्यात आलेली नाही, यासाठी तुम्ही वेळेची मर्यादा ठरवू शकत नाही. आम्हाला चर्चेच्या माध्यमातून यावर तोडगा निघण्याची अपेक्षा आहे," असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी अरूणाचल प्रदेशात चीननं गाव वसवल्याच्या वृत्तावरही भाष्य केलं. "हा परिसर सीमेच्या अतिशय जवळ आहे आणि या ठिकाणी पायाभूत सुविधा अनेक वर्षांच्या कालावधीत विकसित करण्यात आल्या आहेत," असंही ते म्हणाले. 

भारत आणि चीन या देशांदरम्यान द्विपक्षीय संबंध गेल्या चार दशकांच्या किमान स्तरावर आहेत आणि चीननं भारताच्या विश्वासाला तडा दिला आहे का असा प्रश्न राजनाथ सिंह यांना विचारण्यात आला. "चीननं भारताचा विश्वास तोडला आहे यात कोणतीही शंका नाही," असं उत्तर सिंह यांनी यावेळी दिलं. यावेळी त्यांनी सैन्य स्तरावर चर्चेच्या पुढील फेरीता संदर्भ देताना चीननं अलिकडेच १९ जानेवारी रोजीचा चर्चेचा प्रस्ताव ठेवला असल्याचं सांगितलं. "चर्चेच्या एका दिवसांपूर्वीच आम्हाला याची माहिती मिळाली होती. म्हणूनच आम्ही ही चर्चेची फेरी २३ किंवा २४ जानेवारी रोजी पुन्हा निश्चित करण्यास सांगितलं. भारत कायमच चर्चेसाठी तयार असतो," असंही सिंह म्हणाले.

Web Title: India will not reduce troops unless China initiates process defence minister Rajnath Singh in interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.