भारत आता मानवालाही पाठविणार, गगनयान मोहिमेला बळकटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 10:55 AM2023-07-16T10:55:57+5:302023-07-16T10:56:30+5:30

अंतराळवीरांच्या चमूला अंतराळयानाद्वारे पृथ्वीच्या ४०० किमीच्या कक्षेत नेऊन, तिथे तीन दिवस त्यांचे वास्तव्य असेल.

India will now also send humans, strengthening the Gaganyaan mission | भारत आता मानवालाही पाठविणार, गगनयान मोहिमेला बळकटी

भारत आता मानवालाही पाठविणार, गगनयान मोहिमेला बळकटी

googlenewsNext

श्रीहरिकोटा : ‘एलव्हीएम ३’ या अग्निबाणाद्वारे केलेल्या ‘चंद्रयान - ३’च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे मानवाला अंतराळात नेण्याच्या भारताच्या गगनयान या महत्त्वाकांक्षी मोहिमेलादेखील आणखी बळ मिळाले आहे. याच अग्निबाणाच्या साहाय्याने गगनयान मोहीमदेखील पूर्ण होऊ शकते, असा  भारतीय अंतराळ शास्त्रज्ञांचा विश्वास आता दुणावला आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) गगनयान मोहिमेची पूर्वतयारी करत आहे. तीन अंतराळवीरांच्या चमूला अंतराळयानाद्वारे पृथ्वीच्या ४०० किमीच्या कक्षेत नेऊन, तिथे तीन दिवस त्यांचे वास्तव्य असेल.

ह्युमन रेटेड एलव्हीएम ३ असे नामकरण

इस्रोच्या हेवी लिफ्ट लाँचरमध्ये घन अवस्था, द्रव अवस्था आणि क्रायोजेनिक अवस्था असे तीन टप्पे असतात. 
गगनयान या मोहिमेत मानवासहित अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यासाठी एलव्हीएम ३ या अग्निबाणाच्या स्वरूपात काही बदल केले जाणार आहेत. 
या मोहिमेसाठीच्या अग्निबाणाला ह्युमन रेटेड एलव्हीएम ३ असे नाव देण्यात आले आहे. 

गगनयान चाचणी कधी?
चंद्रयान-३सह अवकाशात झेपावलेल्या एलव्हीएम ३ या अग्निबाणाची ४ हजार किलोपर्यंतचे अंतराळयान, उपग्रह वाहून नेण्याची क्षमता आहे. पहिले चाचणी उड्डाण ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस होईल, असे इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी याआधी सांगितले होते. 

Web Title: India will now also send humans, strengthening the Gaganyaan mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.