UAEला खाद्य पुरवठा करण्यासाठी भारत करणार विशेष शेतांची निर्मिती

By admin | Published: March 6, 2017 07:37 AM2017-03-06T07:37:11+5:302017-03-06T07:37:11+5:30

भारत संयुक्त अरब आमिराती(यूएई)साठी विशेष अशा शेतांची निर्मिती करणार आहे.

India will produce special fields to supply food to UAE | UAEला खाद्य पुरवठा करण्यासाठी भारत करणार विशेष शेतांची निर्मिती

UAEला खाद्य पुरवठा करण्यासाठी भारत करणार विशेष शेतांची निर्मिती

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - भारत आणि संयुक्त अरब आमिराती(यूएई)चे संबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहेत. ऊर्जा क्षेत्रात सुरक्षेसाठी भारताच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं यूएईनं उचललेल्या पावलाची सकारात्मक पद्धतीनं भारत परतफेड करण्याच्या तयारीत आहे. भारत संयुक्त अरब आमिराती(यूएई)साठी विशेष अशा शेतांची निर्मिती करणार आहे. यासाठी दोन्ही देश एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत आहेत. अबूधाबीचे शहजाद्यांनी भारताचा दौरा केल्यानंतर दोन्ही देशांनी हा विचार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2015मध्ये अबूधाबीमध्ये जाऊन यूएईसोबत काही करार केले होते. त्यानुसारच जानेवारी 2017मध्ये हा प्रकल्प करण्यावर दोन्ही देशांचं एकमत झालं आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव अमर सिन्हा म्हणाले, यूएईशी झालेल्या करारांनुसार भारताचे फार्म टू पोर्ट या प्रकल्पावर काम सुरू आहे. या प्रकल्पाकडे विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून पाहिलं जाणार आहे. मात्र यात कॉर्परटाइज्ड शेती करणा-यावर भर दिला जाणार आहे. या शेतात यूएईच्या बाजारांवर लक्ष केंद्रित करून शेती करण्यात येणार आहे. तसेच या शेतात पिकवलेला माल लॉजिस्टिक्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून निर्यात करण्यात येणार आहे.

दरम्यान, या संकल्पनेला दोन्ही देशांनी स्वीकारलं असून, या विशेष शेतात पिकवण्यात येणा-या अन्नधान्यावर भारताचा खाद्य सुरक्षा कायदा लागू होणार नाही. जर हा प्रकल्प यशस्वी झाला, तर दोन्ही देशांसाठी कृषी उद्योगात एक नवं सेक्टर तयार होईल. तसेच आम्ही आमच्या कौशल्य, भांडवल, तंत्रज्ञानाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील भागीदार कंपन्यांसोबत उत्पादन वाढवण्यासाठी वापर करणार आहोत. उदा. राफेल विमानं दोन्ही देशांनी विकत घेतली आहेत. त्यामुळे त्याचे भाग आणि उपकरण बनवण्यासाठी दोन्ही देश मिळून प्रयत्न करणार आहेत. याचा निर्णय घेण्यासाठी दोन्ही देशांच्या समित्यांची लवकरच बैठक होईल. मात्र दोन्ही देशांमध्ये असलेल्या कठोर निर्बंधांमुळे हे वाटतं तितकं सोपंही नाही, असंही अमर सिन्हा म्हणाले आहेत. तसेच भारत आणि यूएई हे दोन्ही देश सुरक्षेसाठी एकमेकांचं सहकार्य करत राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

Web Title: India will produce special fields to supply food to UAE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.