सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये भारत जगात पहिला
By admin | Published: January 16, 2015 12:06 PM2015-01-16T12:06:42+5:302015-01-16T12:07:01+5:30
विकसित देशांमध्ये काम करणा-यांना जास्त सुट्ट्या असतात असा भारतीयांचा समज असला तरी एका सर्वेक्षणानुसार जगभरात सर्वाधिक सार्वजनिक सुट्टया या भारतामध्ये असल्याचे समोर आले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - विकसित देशांमध्ये काम करणा-यांना जास्त सुट्ट्या असतात असा भारतीयांचा समज असला तरी एका सर्वेक्षणानुसार जगभरात सर्वाधिक सार्वजनिक सुट्टया या भारतामध्ये असल्याचे समोर आले आहे. भारतामध्ये वर्षभरात सुमारे २१ सार्वजनिक सुट्टया असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.
पर्यटन क्षेत्रात काम करणा-या एका कंपनीने जगभरातील देशांमधील सार्वजनिक सुट्टयांचे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये भारतात सर्वाधिक म्हणजेच २१ सार्वजनिक सुट्ट्या असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. विशेष म्हणजे भारताखालोखाल या यादीमध्ये आशिया खंडातील अन्य देशांचाच नंबर लागतो. फिलीपाईन्समध्ये १८ सार्वजनिक सुट्टया असून याबाबतीत फिलीपाईन्सचा जगात दुसरा नंबर लागतो. चीन आणि हाँगकॉंग हे देश १७ सुट्ट्यांसह संयुक्तपणे तिस-या स्थानावर आहेत. थायलंड १६ सुट्ट्यासह चौथ्या स्थानावर आहे. स्पेन आणि इंग्लंडमध्ये सर्वात कमी म्हणजेच फक्त ८ सार्वजनिक सुट्ट्या असतात.