भारतीय हवाई दलाचं ‘जॅग्वार’ फायटर विमान गुजरातमध्ये कोसळलं, एका पायलटचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2018 12:27 PM2018-06-05T12:27:29+5:302018-06-05T12:27:29+5:30

या घटनेमध्ये एका पायलटचा मृत्यू झाला आहे.

indian air force aircraft jaguar crashed in kutchs mandra area, pilot dead | भारतीय हवाई दलाचं ‘जॅग्वार’ फायटर विमान गुजरातमध्ये कोसळलं, एका पायलटचा मृत्यू

भारतीय हवाई दलाचं ‘जॅग्वार’ फायटर विमान गुजरातमध्ये कोसळलं, एका पायलटचा मृत्यू

अहमदाबाद- गुजरातमध्ये मंगळवारी भारतीय वायू सेनेचं एक विमान क्रॅश झालं. मंगळवारी सकाळी कच्छच्या मुंदडा भागात हा अपघात झाला. भारतीय हवाई दलाचं ‘जॅग्वार’ हे फायटर विमान येथे कोसळलं. या जॅग्वार विमानाने जामनगर येथून उड्डाण घेतलं होतं अशी माहिती आहे. या घटनेमध्ये एका पायलटचा मृत्यू झाला आहे. संजय चौहान असं मृत पायलटचं नाव आहे.



 

जामनगरहून सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास विमानाने उड्डाण घेतलं होतं. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अजून माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 



 

या अपघातात मृत्यू झालेले पायलट संजय चौहान हे वरिष्ठ पायलट पदावर कार्यरत होते. एअर कमोडोर पदावर ते कार्यरत होते. 
 

Web Title: indian air force aircraft jaguar crashed in kutchs mandra area, pilot dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :airplaneविमान