हवाईदल प्रमुख भदौरिया यांचा चीनला इशारा; भारताशी खेटने योग्य नाही, आम्ही प्रत्युत्तर द्यायला तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 09:23 PM2020-12-29T21:23:42+5:302020-12-29T21:29:21+5:30
भदौरिया म्हणाले, पाकिस्तानला प्यादे बनवून चीन आपले वर्चस्व वाढवू पाहत आहे. अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे.
नवी दिल्ली -हवाईदल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी मंगळवारी चीनला थेट इशारा दिला. चीनला कठोर शब्दात इशारा देताना ते म्हटले, की भारताशी खेटने चीनसाठी जागतिक स्थराचा विचार करता योग्य ठरणार नाही. चीनची महत्वाकांक्षा जागतीक लेवलची असेल, तर ती त्यांच्या योजनांना सूट करत नाही. भदौरिया यांनी मंगळवारी एका कार्यक्रमादरम्यान चीनला हा इशारा दिला.
चीनकडून मोठ्या प्रमाणावर सैनिकांची तैनाती -
हवाईदल प्रमुख म्हणाले, लाईन ऑफ एक्चुअल कंट्रोल (एलएसी)वर चीनने मोठ्या प्रमाणावर सैनिक तैनात केले आहेत. त्यांच्या जवळ रडार, जमिनीवरून हवेत आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे मिसाईल्स मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणावर तैनाती केली आहे. मात्र, आपणही सर्व प्रकारची आवश्यक ती तयारी केली आहे.
लद्दाखमध्ये LACजवळ दोन्ही देशांचे सैन्य मोठ्या प्रमाणावर जमलेले आहे -
भारत आणि चीन यांच्यात गेल्या 8 महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे. लद्दाखमध्ये LACजवळ दोन्ही देशांचे सैन्य मोठ्या प्रमाणावर जमलेले आहे. मे महिन्यापासूनच दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. जून महिन्यात गलवान खोऱ्यात हिंसक झटापटही झाली होती. हा तणाव कमी करण्यासाठी अनेक वेळा सैन्य स्थरावरील चर्चाही झाली. एवढेच नाही, तर दोन्ही देशांच्या संरक्षण आणि परराष्ट्रमंत्र्यांची बैठक झाली आहे.
Any serious India-China conflict isn't good for China at global front. If Chinese aspirations are global then it doesn't suit their grand plan. What could be possible Chinese objectives for their action in north?...It's imp that we recognise what they've really achieved:IAF Chief pic.twitter.com/wtwPR8dGVk
— ANI (@ANI) December 29, 2020
'चीनची वर्चस्व वाढविण्याची इच्छा' -
भदौरिया म्हणाले, पाकिस्तानला प्यादे बनवून चीन आपले वर्चस्व वाढवू पाहत आहे. अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे.
भारताला अपली क्षमता कायम ठेवण्याची आवश्यकता -
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने भाग घेत भदौरिया म्हणाले, छोटे देश आणि फुटीरतावाद्यांच्या मदतीने चीनला ड्रोन सारखे कमी खरचाचे तंत्रज्ञान सहजपणे उपलब्ध होत आहे. यामुळे तो प्रतिकूल प्रभाव निर्माण करण्यात यशस्वी होत आहे. तसेच, जर स्थिती निर्माण झालीच, तर भारताला कसल्याही स्थितीचा सामना करण्यासाठी अपली क्षमता कायम ठेवण्याची आवश्यकता आहे, असेही भदौरिया म्हणाले.