भारतीय हवाई दलाचे मिग -२१ लढाऊ विमान कोसळलं; सुदैवाने पायलटचा वाचला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 06:55 PM2021-08-25T18:55:21+5:302021-08-25T19:01:33+5:30

Fighter aircraft of the Indian Air Force crashed : राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यापासून ३५ किमी दूर असलेल्या मातसर गावाजवळ संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास हवाई दलाचे मिग-२१ विमान कोसळले.

Indian Air Force MiG-21 fighter jet crashes; Fortunately, the pilot survived | भारतीय हवाई दलाचे मिग -२१ लढाऊ विमान कोसळलं; सुदैवाने पायलटचा वाचला जीव

भारतीय हवाई दलाचे मिग -२१ लढाऊ विमान कोसळलं; सुदैवाने पायलटचा वाचला जीव

Next
ठळक मुद्देहवाई दलाचे मिग -२१ बाइसन (A MiG-21 Bison) लढाऊ विमान कोसळले आहे. सुदैवाने या अपघातातून पायलट सुखरूप बचावला आहे.

राजस्थानमधील बाडमेर येथे मोठी दुर्घटना घडली आहे. येथे भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले आहे. हवाई दलाचे मिग -२१ बाइसन (A MiG-21 Bison) लढाऊ विमान कोसळले आहे. सुदैवाने या अपघातातून पायलट सुखरूप बचावला आहे. प्रशिक्षणादरम्यान हे विमान कोसळल्याची माहिती मिळत आहे. 

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यापासून ३५ किमी दूर असलेल्या मातसर गावाजवळ संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास हवाई दलाचे मिग-२१ विमान कोसळले. प्राप्त माहितीनुसार, पायलट सुरक्षित आहे. बाडमेरचे पोलीस अधीक्षक आनंद शर्मा यांनी सांगितले की, मिग-२१ बाइसन क्रॅश झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखले झाले आहेत. अग्निशमन दलही घटनास्थळी आहे.

 

Web Title: Indian Air Force MiG-21 fighter jet crashes; Fortunately, the pilot survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.