भारतीय हवाई दल कोणत्याही क्षणी युद्धासाठी तयार, एअर चीफ मार्शल बी. एस. धनोवा यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2017 05:33 PM2017-10-08T17:33:29+5:302017-10-08T17:34:06+5:30

भारतीय हवाई दल कोणत्याही क्षणी युद्धासाठी तयार असल्याचं विधान एअर चीफ मार्शल बी. एस. धनोवा यांनी केलं आहे. हवाई दलाच्या 85वा स्थापना दिवसाच्या निमित्तानं ते बोलत होते.

Indian Air Force ready for war at any time, Air Chief Marshall B S. Information about Dhanova | भारतीय हवाई दल कोणत्याही क्षणी युद्धासाठी तयार, एअर चीफ मार्शल बी. एस. धनोवा यांची माहिती

भारतीय हवाई दल कोणत्याही क्षणी युद्धासाठी तयार, एअर चीफ मार्शल बी. एस. धनोवा यांची माहिती

googlenewsNext

गाझियाबाद - भारतीय हवाई दल कोणत्याही क्षणी युद्धासाठी तयार असल्याचं विधान एअर चीफ मार्शल बी. एस. धनोवा यांनी केलं आहे. हवाई दलाच्या 85वा स्थापना दिवसाच्या निमित्तानं ते बोलत होते. हवाई दलाच्या गाझियाबाद येथील हिंडन एअरबेसवर आज मोठं शक्तिप्रदर्शनही करण्यात आलं आहे.

यावेळी सुखोई, तेजस, मिराज, मिग, लढाऊ विमान सी-17, सी-130 यांसारखी विमानं व हेलिकॉप्टर या कवायतीमध्ये सहभागी झाली होती. एअर चीफ मार्शल बी. एस. धनोवा यांनी दिवंगत मार्शल अर्जुन सिंह यांच्या आठवणी जागवल्या. तसेच गुरुवारी दुर्घटनाग्रस्त झालेल्या एम-17 व्ही-5 हेलिकॉप्टरमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांनाही त्यांनी आदरांजली अर्पण केली.

भारताला शेजारील देशांसोबत शांतता प्रस्थापित करायची आहे. मात्र गरज पडल्यास कुठल्याही क्षणी आम्ही नौदल व लष्करासोबत दोन्ही आघाड्यांवर लढण्यास सज्ज आहोत. युद्धासाठी आम्ही केव्हाही तयार आहोत, हेसुद्धा शत्रूंनी लक्षात ठेवावे, असं एअर चीफ मार्शल धनोवा म्हणाले आहेत.



पठाणकोट हल्ल्यानंतर आता एअरबेसच्या सुरक्षेच्या दृष्टीने कडक उपाययोजना करण्यात आल्यात. हवाई दल दिवसेंदिवस काळासोबत अत्याधुनिक होत आहे. विमानांच्या आधुनिकीकरणासोबतच स्वदेशी बनावटीची लढाऊ विमानं हवाई दलात समाविष्ट करण्यात आल्यामुळे वायुसेनेच्या सामर्थ्यात वाढ झाली आहे, असं विधानही धानोवा यांनी केलं आहे.




Web Title: Indian Air Force ready for war at any time, Air Chief Marshall B S. Information about Dhanova

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.