ते एफ-16 विमान विंग कमांडर अभिनंदन यांनीच पाडले, हवाई दलाने फेटाळला अमेरिकन मासिकाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 07:38 PM2019-04-05T19:38:56+5:302019-04-05T19:39:37+5:30
पाकिस्तानच्या ताफ्यात असलेली सगळी एफ-16 विमाने सुरक्षित असल्याचा अमेरिकन मासिकाने केलेला दावा भारतीय हवाई दलाने फेटाळून लावला आहे.
नवी दिल्ली - पाकिस्तानच्या ताफ्यात असलेली सगळी एफ-16 विमाने सुरक्षित असल्याचा अमेरिकन मासिकाने केलेला दावा भारतीय हवाई दलाने फेटाळून लावला आहे. भारताच्या एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने केलेला प्रतिहल्ला परतवून लावत असताना विंग कमांडर अभिनंदन यांनी एफ-16 विमान पाडले होते. तसेच भारतावर हल्ला करण्यासाठी आलेल्या एफ-16 विमानांपैकी एक विमान परत माघारी फिरले नसल्याचे पाकिस्तानी हवाई दलाच्या रेडिओ संभाषणातून उघड झाले आहे, असा दावा हवाई दलाच्या सूत्रांनी केला आहे.
14 फेब्रुवारी रोजी काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत या हल्ल्याचा बदला घेतला होता. दरम्यान, 27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानी हवाई दलाने भारताच्या हद्दीत घुसखोरी करून भारताला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क असलेल्या भारतीय हवाई दलाने हा हल्ला हाणून पाडला होता. दरम्यान, यावेळी उडालेल्या हवाई चकमकीत मिग विमान चालवत असलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले होते.
IAF Sources in response to question asked on US media report which questioned IAF version of Pakistan F-16 shot down by IAF MIG Bison Jet: Wing Commander Abhinandan Varthaman shot down Pakistan Air Force F-16 aircraft 7-8 km inside Pakistan Occupied Area in Sabzkot area there. pic.twitter.com/Q7OEizJsCD
— ANI (@ANI) April 5, 2019
मात्र 27 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये झालेल्या हवाई चकमकीत एक-16 विमान कोसळलेच नसल्याचा तसेच पाकिस्तानच्या ताफ्यातील सगळी एफ - 16 विमाने सुरक्षित असल्याचा दावा एका मासिकाने केल्याने खळबळ उडाली होती. मात्र भारतीय हवाई दलाने हा दावा फेटाळून लावला आहे. ''विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानी हवाई दलाचे एफ-16 विमान पाकव्याप्त काश्मीरच्या 7 ते 8 किमी आत असलेल्या सब्झकोट भागात पाडले होते. तसेच पाकिस्तानी हवाई दलाचे रेडिओ संभाषण आम्ही रेकॉर्ड केले असून, त्या संभाषणामधून भारतावर हल्ला करणाऱ्या एफ-16 विमानांपैका एक विमान माघारी आले नसल्याचे स्पष्ट होत आहे , असा दावा भारतीय हवाई दलामधील सूत्रांनी केला आहे.
IAF sources also confirmed that radio communication of Pakistan Air Force intercepted by it confirms that one of the F-16s that attacked India on February 27 did not return to its base. https://t.co/pwjMA9tk0e
— ANI (@ANI) April 5, 2019
27 फेब्रुवारी रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी विमाने कोसळली होती. त्यातील एक विमान भारतीय हवाई दलाचे मिग 21- बिसॉन होते. तर अन्य पाकिस्तानी हवाई दलाचे विमान होते. तसेच इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरवरून ते विमान पाकिस्तानी हवाई दलाकडे असलेले एफ-16 होते हे उघड होत आहे.
IAF: Indian Forces have confirmed sighting ejections at 2 different places on that day(Feb 27). The 2 sightings were at places separated by at least 8-10 km. One was an IAF MIG 21 Bison & other a PAF aircraft. Electronic signatures gathered by us indicate PAF aircraft was a F-16. pic.twitter.com/x1N84BiqM9
— ANI (@ANI) April 5, 2019