भारतीय हवाई दलाने सादर केले एफ-16 विमान पाडल्याचे पुरावे, पाकिस्तान तोंडघशी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 06:17 PM2019-04-08T18:17:06+5:302019-04-08T18:38:19+5:30

27 फेब्रुवारी रोजी झालेल्या हवाई चकमकीत एफ-16 विमान पाडले गेले नसल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय हवाई दलाने जबरदस्त चपराक दिली आहे.

Indian Air Force Shear irrefutable evidence of Shout down of F-16 plane | भारतीय हवाई दलाने सादर केले एफ-16 विमान पाडल्याचे पुरावे, पाकिस्तान तोंडघशी

भारतीय हवाई दलाने सादर केले एफ-16 विमान पाडल्याचे पुरावे, पाकिस्तान तोंडघशी

Next

नवी दिल्ली - 27 फेब्रुवारी रोजी झालेल्या हवाई चकमकीत एफ-16 विमान पाडले गेले नसल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानलाभारतीय हवाई दलाने जबरदस्त चपराक दिली आहे. एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तानच्या हवाई दलाच्या लढाऊ विमानांमध्ये झालेल्या हवाई चकमकीत पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले गेल्याचे पुरावेच भारतीय हवाई दलाने प्रसिद्ध केले आहे. तसेच हे एफ-16 विमान मिग-21 बिसॉन या विमानानेच पाडल्याचेही हवाई दलाने अधोरेखित केले आहे. 


27 फेब्रुवारी रोजी झालेल्या हवाई चकमकीदरम्यान दोन विमाने कोसळली. त्यातील एक भारतीय हवाई दलाचे मिग-21 बिसॉन होते. तर दुसरे विमान पाकिस्तानी हवाई दलाचे एफ-16 विमान होते.  एअर व्हाइस मार्शल आरजीके कपूर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तानच्या हवाई दलांमध्ये उडालेल्या चकमकीचा वृत्तांत पुराव्यांसहीत सादर केला. यावेळी त्यांनी चकमकीदरम्यानच्या रडार इमेजही प्रसिद्ध केल्या. 




यावेळी आरजीके कपूर म्हणाले की, त्या दिवशी झालेल्या चकमकीत पाकिस्तानने आपले एक एफ-16 विमान गमावले. हे सिद्ध करणारे अनेक सबळ पुरावे आमच्याकडे आहे. मात्र सुरक्षा आणि गोपनीयतेच्या प्रश्नामुळे आम्ही ही माहिती सार्वजनिक केली नाही. 




 विंग कमांडर अभिनंदन सारथ्य करत असलेल्या मिग-21 बिसॉन विमानानेच पाकिस्तानचे एफ 16 विमान पाडल्याचा पुनरुच्चार करताना एअर व्हाइस मार्शल आरजीके कपूर यांनी एफ-16 विमान ज्या ठिकाणी पाडले गेले त्या ठिकाणाचे रडारवरील छायाचित्रही दाखवले. 



 

Web Title: Indian Air Force Shear irrefutable evidence of Shout down of F-16 plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.