केदारनाथमध्ये भारतीय हवाई दलाचं M-17 हेलिकॉप्टर कोसळलं, 5 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 11:25 AM2018-04-03T11:25:24+5:302018-04-03T11:41:04+5:30
भारतीय हवाई दलाच्या एम-17 हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
उत्तराखंड - भारतीय हवाई दलाच्या एम-17 हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लँडिंग करत असताना भारतीय हवाई दलातील कार्गो हेलिकॉप्टरची लोखंडी गर्डरला धडक बसली व यानंतर हेलिकॉप्टरमध्ये आग लागली. या दुर्घटनेत पायलटसहीत एकूण 5 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.
केदारनाथ मंदिराजवळ ही दुर्घटना घडली आहे. गुप्तकाशी येथून केदारनाथला हेलिकॉप्टर जात होते. हेलिकॉप्टरमध्ये बांधकामाचं साहित्य होते. केदारनाथमध्ये हे साहित्य पोहोचवत असताना हा अपघात झाला.
दुर्घटना घडली तेव्हा हेलिकॉप्टरमध्ये पायलटसहीत एकूण 6 जण होते. दरम्यान, अपघातामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अपघाताचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
#UPDATE Four people including the pilot suffered minor injuries after Indian Air Force's MI-17 helicopter caught fire following collision with an iron girder while landing at helipad near Kedarnath temple in Uttarakhand. (The helicopter is not of the Army as mentioned earlier) pic.twitter.com/l59bFVV4eP
— ANI (@ANI) April 3, 2018
Uttarakhand: One cargo helicopter of Army caught fire after it collided with an iron girder while landing at helipad near Kedarnath temple; More details awaited pic.twitter.com/8NhmYu7v4U
— ANI (@ANI) April 3, 2018