Indian Air Strike on Pakistan: जिगरबाज लष्करानं शेअर केलेली 'ही' कविता वाचूनही वीरांना कराल सलाम!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 01:12 PM2019-02-26T13:12:02+5:302019-02-26T13:53:17+5:30
एअर स्ट्राईकची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरून एक कविता प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तेथील दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानच्या बालाकोट येथील बहुतांशी दहशवादी तळ उद्धवस्त करण्यात आले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला करून, जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर बॉम्बवर्षाव करून भारतीय वायुसनेनं आज पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय लष्कराच्या या धडाकेबाज कारवाईचं सर्वच स्तरांतून कौतुक होतं आहे.
एअर स्ट्राईकची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरून एक कविता प्रसिद्ध करण्यात आली आहे. ट्वीटमध्ये बंदूक रोखलेल्या एका भारतीय जवानाचा फोटोही पोस्ट करण्यात आला आहे. तसेच #IndianArmy आणि #NationFirst हे हॅशटॅग वापरण्यात आले आहेत. भारतीय लष्कराने प्रसिद्ध कवी रामधारी सिंह यांच्या कवितेमधील काही ओळी ट्वीट केल्या आहेत.
‘क्षमाशील हो रिपु-समक्ष
तुम हुए विनीत जितना ही,
दुष्ट कौरवों ने तुमको
कायर समझा उतना ही।
सच पूछो, तो शर में ही
बसती है दीप्ति विनय की,
सन्धि-वचन संपूज्य उसी का जिसमें शक्ति विजय की।’
'क्षमाशील हो रिपु-समक्ष
— ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) February 26, 2019
तुम हुए विनीत जितना ही,
दुष्ट कौरवों ने तुमको
कायर समझा उतना ही।
सच पूछो, तो शर में ही
बसती है दीप्ति विनय की,
सन्धि-वचन संपूज्य उसी का जिसमें शक्ति विजय की।'#IndianArmy#AlwaysReadypic.twitter.com/bUV1DmeNkL
14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे 'जैश-ए-मोहम्मद'नं सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्याची, सर्जिकल स्ट्राइक-2 करण्याची तीव्र भावना देशभरातून व्यक्त होत होती. ही इच्छा आज वायुसेनेने पूर्ण केली आहे. 'मिराज 2000' या हायटेक लढाऊ विमानांमधून भारतानं 1000 किलोचे बॉम्ब 'जैश'च्या तळांवर पाडले. त्यात 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं समजतं.
Indian Air Strike : भारतीय हद्दीत घुसणारा पाकिस्तानी ड्रोन नष्ट, सैन्याचा असाही एक स्ट्राईक https://t.co/XntQeToU9n
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 26, 2019
भारतीय वायू सेनेकडून पाकिस्तानमध्ये घुसून तेथील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला. या हल्ल्याच्या वृत्ताला भारत सरकारकडूनही दुजोरा देण्यात आला आहे. त्यानंतर, काही तासांतच गुजरातमधील कच्छ प्रांतात पाकिस्तानचे एक ड्रोन फिरताना आढळून आले. मात्र, भारताकडून पाकचे हे ड्रोनही नेस्तनाबूत करण्यात आले आहे. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर दोन्ही देशांमधील सीमा भागांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारताने का आणि कसा केला हवाई हल्ला; परराष्ट्र सचिवांची अधिकृत माहिती https://t.co/GFI56TEj4h
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 26, 2019
Indian Air Strike on Pakistan: भारतीय वायुसेनेची चलाखी; पाकिस्तानला 'असा' दिला चकवा!
दहशवाद्यांवर कारवाई करताना भारतीय वायुसेनेने पाकिस्तानला मोठा चकवा दिला आहे. भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000' च्या 12 लढाऊ विमानांची हा हल्ला केला. मात्र, पाकिस्तानला हल्ला करण्यात येणार आहे, याचा सुगावा लागू नये म्हणून भारतीय वायु सेनेने देशातील 20 विमानतळांवरून 'मिराज'च्या विमानांचे उड्डाण केले. या मध्ये ग्वाल्हेर, भटिंडा, अंबाला या विमानतळांचा समावेश आहे.
भारतीय वायू सेनेकडून मध्यरात्री 3.30 वाजता बालाकोट येथील दहशतवादी तळांवर मिराज आणि सुखोई या विमानांच्या सहाय्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर दोन्ही उभय देशांमध्ये वेगवाग घडामोडी सुरू आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मेहमूद कुरेशी यांनी तातडीची बैठक बोलावून या हल्ल्यासंदर्भात चर्चा सुरू केली आहे. तर, भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनीही या हल्ल्यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून का आणि कुठे हल्ला केला, याची माहिती गोखले यांनी दिली. पाकिस्तानमधील संघटना जैश ए मोहमद हे भारतीय सैन्यावर आणखी हल्ले करण्याच्या तयारीत होते. तत्पूर्वीच भारतीय सैन्याने हल्ला घडवून त्यांच कंबरड मोडलं आहे. या हल्ल्यात जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेचे अनेक दहशतवादी, कमांडर, ट्रेनी दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. मात्र, या हल्ल्यात नागरिकांना कुठलाही त्रास झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
'मिराज 2000'नेच उतरवला पाकिस्तानचा माज https://t.co/p1PtTdQCG1#IndianAirForce#Surgicalstrike2#IndianAirStrike
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 26, 2019