Indian Air Strike on Pakistan: मुंबईच्या 26/11 हल्ल्यानंतरही 'एअर स्ट्राईक'साठी आम्ही सज्ज होतो, पण ...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 11:13 AM2019-02-27T11:13:37+5:302019-02-27T11:17:31+5:30
Indian Air Strike on Pakistan: भारतीय वायुसेनेने धाडसी कारवाई करत जैश-ए-मोहम्मदला दणका दिला. नियंत्रण रेषा ओलांडून कारवाई करत भारतानं 12 दिवसांपूर्वी पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला.
भारतीय सैन्याने केवळ 12 दिवसात पुलवामातील भ्याड हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. या हल्ल्यानंतर भारताने केवळ 12 दिवसात पाकिस्तानचा बदला घेत दहशतवाद्यांचं तेरावं घातल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन येत आहेत. देशवासियांकडून या निर्णयाचे स्वागत होत असून भारतीय सैन्याला सॅल्यूट करण्यात येत आहे. मात्र, 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतरही अशीच कारवाई होणे गरजेचे होते, असे एका वायू सेनेच्या माजी अधिकाऱ्याने म्हटलं आहे. तसेच, देर आए दुरुस्त आये असेही ते म्हणाले.
भारतीय वायुसेनेने धाडसी कारवाई करत जैश-ए-मोहम्मदला दणका दिला. नियंत्रण रेषा ओलांडून कारवाई करत भारतानं 12 दिवसांपूर्वी पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. त्यानंतर, देशभरातून भारतीय सैन्याचं कौतुक करण्यात आलं. तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताने केलेल्या कारवाईची दखल घेण्यात आली. मात्र, 2008 मधील मुंबई हल्ल्यानंतरही अशीच कारवाई करणे अपेक्षित होते, पण तेव्हाच्या सरकारने हे धाडस दाखवले नाही, असे वायू सेनेतील एका माजी अधिकाऱ्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलंय. 2008 मध्ये मुंबईवर जेव्हा 26/11 चा हल्ला झाला त्यानंतरही वायू सेनेला मुझफ्फराबाद येथील पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई करायची होती. मात्र, तत्कालीन सरकारने संमती न दिल्यामुळे त्यावेळी पाकिस्तानला जशास तसं उत्तर देता आलं नाही. मत्र, या कारवाईने समाधान झाल्याचे मोहंतो पॅन्गींग या सेवानिवृत्त वैमानिकाने याबाबतचे ट्विट करुन आपल्या 2008 नंतरची परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
Finally terrorist camps in POK hit by Laser Guided Bombs from IAF Mirage 2000. We were about to hit POK camps in Muzzafarrabad after Mumbai attacks in 2008. Finally the Govt did not decide. Our Sukhoi Sqn under my Command was involved. Der Aaye Par Durusht Aaye. Cheers!!
— Mohonto Panging (@MontyPanging) February 26, 2019
दरम्यान, एकप्रकारे मोहंतो पॅन्गींग यांनी तत्कालीन सरकारच्या इच्छाशक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सरकारने परवानगी न दिल्यामुळेच भारतीय वायू सेनेकडून कारवाई करण्यात आली नाही. मात्र, वायू सेना तेव्हाही तयार होती. चलो, देर आए दुरूस्त आए असे म्हणत पॅगींग यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारचे कौतुक करताना, काँग्रेस सरकारची भूमिका विशद केली आहे.