Indian Air Strike on Pakistan: 'हाऊ इज द जोश'.... नेटीझन्सकडून भारतीय वायू सेनेला धन्यवाद अन् अभिनंदन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 10:12 AM2019-02-26T10:12:37+5:302019-02-26T10:26:52+5:30
भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी हल्ल्यांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे.
नवी दिल्ली - भारतीय वायू सेनेकडून पाकिस्तानवर Air Strike करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 1000 किलो स्फोटकांचा मारा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर करण्यात आला. या हल्ल्यात अनेक दहशवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे. भारताच्या या हवाई हल्ल्यानंतर सोशल मीडियावरुन भारतीय सैन्याचे आभार मानण्यात येत आहेत. तसेच #josh, #Air strike, #indianairforce #balakot #surgicalstrike2 हे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत.
भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानच्या बालाकोट येथील बहुतांशी दहशवादी तळ उद्धवस्त करण्यात आले आहेत. मिराज फायटर जेटच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला आहे. पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास हा हवाई हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानचे मेजर जनरल गुफूर यांनी भारतीय हवाईदलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे. तसेच पाकिस्तानी विमानांनी भारताच्या विमानांना पळवून लावल्याचा दावाही केला आहे. मात्र, हा दावा करताना त्यांच्याकडून भारताने केलेल्या हवाई हल्ल्याचे काही फोटोही शेअर करण्यात आले आहेत. सध्या, सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत. तसेच या हल्ल्याची बातमी येताच ट्विटरवर Air Strike नावाचा ट्रेंड सुरू झाला आहे.
How's the Jaish? Bombed sir! How's the Jaish?Bombed sir! How's the Jaish?Bombed sir? Kudos to the Indian Air Force.Praying for your safety. Jai Hind!! #Balakot
— Hemang Badani (@hemangkbadani) February 26, 2019
शुक्र है इस बार लगता है देश के भीतर कोई सबूत नहीं दिखाना पड़ेगा...दुश्मन ने ख़ुद मान लिया है #Balakot
— Manak Gupta (@manakgupta) February 26, 2019
The air strikes at #Balakot, Jaish-e-Muhammad terror outfit's oldest training camps, is best tribute to our fallen heroes. This is #NewIndia and this is our permanent answer to the terrorists and its patrons. The nation stands united with our brave soldiers! Jai Hind!
— Vinod Tawde (@TawdeVinod) February 26, 2019
#Balakot What next:1. India bombed terrorist camps not military targets. Pak can’t retaliate in kind as India has no such camps 2.Pak can keep claiming no damage & ignore raid, but GOI may reveal satellite imagery for PR. 3.Pak may allege civilian deaths, widening target range.
— K. C. Singh (@ambkcsingh) February 26, 2019