सौंगध मुझे इस मिट्टी की... नरेंद्र मोदींची कवितेतून देशरक्षणाची शपथ अन् मतदारांना साद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 02:25 PM2019-02-26T14:25:55+5:302019-02-26T14:29:08+5:30

देश सुरक्षित हातांमध्ये आहे, असं ठामपणे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांना 'मिशन २०१९' साठी साद घातली.

Indian Air Strike on Pakistan: Today I assure the countrymen, the country is in safe hands: Narendra Modi | सौंगध मुझे इस मिट्टी की... नरेंद्र मोदींची कवितेतून देशरक्षणाची शपथ अन् मतदारांना साद

सौंगध मुझे इस मिट्टी की... नरेंद्र मोदींची कवितेतून देशरक्षणाची शपथ अन् मतदारांना साद

Next

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय वायुसेनेनं आज 'एअर स्ट्राइक'नं घेतला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये १००० किलोचे बॉम्ब टाकून भारताने २५० ते ३०० दहशतवाद्यांचा खात्मा केला. या धडाकेबाज कामगिरीनंतर, राजस्थानातील चुरू इथल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशरक्षणाची शपथ घेतली. देश सुरक्षित हातांमध्ये आहे, असं ठामपणे सांगत त्यांनी मतदारांना 'मिशन २०१९' साठी सादही घातली.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये एका कवितेतून देशाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. तीच कविता त्यांनी आज पुन्हा सादर केली. 'देश नहीं मिटने दूंगा, देश नहीं रुकने दूंगा' अशी ग्वाही त्यांनी जनतेला दिली आणि वीर जवानांना मानाचा मुजरा केला. 



नरेंद्र मोदींनी सादर केलेली कविता अशीः 

सौंगध मुझे इस मिट्टी की
मैं देश नही मिटने दूंगा
मै देश नही रुकने दूंगा
मै देश नही झुकने दूंगा

सौंगध मुझे इस मिट्टी की...

मेरा वचन है भारत मां को 
तेरा शीश झुकने नही दूंगा
सौंगध मुझे इस मिट्टी की
मै देश नहीं मिटने दूंगा

सौंगध मुझे इस मिट्टी की...

जाग रहा है देश मेरा
हर भारतवासी जितेगा
सौंगध मुझे इस मिट्टी
मै देश नहीं मिटने दूंगा

सौंगध मुझे इस मिट्टी की...

हमे फिर से दोहराना है 
और  खुद को याद दिलाना है
न भटकेंगे, न अटकेंगे
कुछ भी हो हम देश नहीं मिटने देंगे

सौंगध मुझे इस मिट्टी
मै देश नहीं मिटने दूंगा ।।



 

Web Title: Indian Air Strike on Pakistan: Today I assure the countrymen, the country is in safe hands: Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.