Indian Air Strike on Pakistan: 'एअर स्ट्राइक'वर कंट्रोल रुममधून होती नरेंद्र मोदींची नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 02:01 PM2019-02-26T14:01:15+5:302019-02-26T14:04:52+5:30

भारतीय हवाई दलानं आज मोठी कारवाई करत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत

Indian Air Strike on Pakistan:prime minister narendra modi indian air force india strikes balakot pakistan jaish e mohammed south block | Indian Air Strike on Pakistan: 'एअर स्ट्राइक'वर कंट्रोल रुममधून होती नरेंद्र मोदींची नजर

Indian Air Strike on Pakistan: 'एअर स्ट्राइक'वर कंट्रोल रुममधून होती नरेंद्र मोदींची नजर

Next
ठळक मुद्देभारतीय हवाई दलानं आज मोठी कारवाई करत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईची भारतीय लष्करासह पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रशंसा केली आहे. 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवादी तळांवर हल्ले करत होती. त्यावेळी मोदी साऊथ ब्लॉकमध्ये होते आणि कंट्रोल रुममधून त्यांचं पूर्ण मोहिमेवर लक्ष होतं.

नवी दिल्ली-भारतीय हवाई दलानं आज मोठी कारवाई करत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईची भारतीय लष्करासह पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रशंसा केली आहे. 14 फेब्रुवारीला पुलवामा हल्ल्यानंतर मोदींनी बदला घेणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. भारतीय हवाई दलाच्या मिराज 2000’ची 12 लढाऊ विमानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवादी तळांवर हल्ले करत होती. त्यावेळी मोदी साऊथ ब्लॉकमध्ये होते आणि कंट्रोल रुममधून त्यांचं पूर्ण मोहिमेवर लक्ष होतं. बालाकोटमध्ये जवळपास 3.45 वाजता, मुजफ्फराबादमध्ये 3.48 वाजता, तर चाकोटीमध्ये 3.58मध्ये प्रशिक्षण शिबिरांवर हल्ला केला आहे.

या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोदींचं अभिनंदन केलं आहे. दहशतवादी शिबिरांना नेस्तनाबूत करण्यात आलं आहे. मोदींनी पहिलंच सांगितलं होतं की, लष्कराला कारवाईसाठी मोकळीक दिली आहे. मी पंतप्रधानांना शुभेच्छा देतो, सर्व नागरिकांच्या इच्छेप्रमाणे कारवाई झाली आहे. तर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, हे देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचं पाऊल आहे.

हा महापराक्रम आहे. मोदींनी लष्कराला कारवाईची सूट दिली होती. त्यानंतर पूर्ण देश त्यांच्या पाठीशी होता. भारतानं 2016ला उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राइक केली होती, त्यावेळीही मोदी पूर्ण रात्र ऑपरेशनची माहिती घेत होते. सर्जिकल स्ट्राइकमध्ये एकही जवान जखमी होणार नाही, हेसुद्धा निश्चित करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी या स्ट्राइकवर नजर ठेवून होते. तीन दिवसांपूर्वीच राजस्थानमध्ये एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले होते, हा बदललेला भारत आहे. यावेळी सर्व हिशेब पूर्ण करू. हा हल्ल्याच्या घावानंतर आम्ही शांत राहणार नाही. आम्ही दहशतवाद्यांना संपवू. मोदींच्या या विधानाप्रमाणेच त्यांनी कारवाईही केली आहे. 
 

Web Title: Indian Air Strike on Pakistan:prime minister narendra modi indian air force india strikes balakot pakistan jaish e mohammed south block

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.