अभिमानास्पद! भारतीय वंशाच्या १५ वर्षीय चिमुरडीने मिळवला पहिला TIME अवॉर्ड, बनली 'किड ऑफ द ईयर'
By manali.bagul | Published: December 4, 2020 05:16 PM2020-12-04T17:16:56+5:302020-12-04T17:38:17+5:30
Trending News in Marathi: अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाणी प्रदूषण ते औषधांचं व्यसन आणि सायबर बुलींग अशा विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तिने काम केलं आहे.
टाईम मॅगजीनने पहिल्यांदाच एका लहान मुलीला पुरस्कार देऊन गौरवलं आहे. विशेष म्हणजे हा खास पुरस्कार मुळची भारतीय आणि अमेरिकेतील रहिवासी असलेल्या गीतांजली राव हिला मिळाला आहे. 202 च्या किड ऑफ द ईयर साठी या भारतीय वंशाच्या मुलीची निवड करण्यात आली आहे. अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाणी प्रदूषण ते औषधांचं व्यसन आणि सायबर बुलींग अशा विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तिने काम केलं आहे. यासाठी‘टाईम्स’ने सन्मानाने तिचा गौरव केला आहे. गीतांजलीचे वय अवघे 15 वर्षे आहे.
कोलोरॅडो येथिल रहिवासी असलेल्या गीतांजलीची 5 हजार नामांकनातून निवड झाली. हॉलीवूड अभिनेत्री अँजेलीना जोलीने तिची मुलाखत घेतली. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक पातळीवर सामाजिक समस्यांवर कशी मात करता येईल याबाबत गीतांजलीचे प्रयत्न सुरू आहेत. 'टाईम'शी बोलताना गीतांजलीने दिलेल्या माहितीनुसार वयाच्या दहाव्या वर्षी तीने पहिल्यांदा आपल्या पालकांना कार्बन नॅनोट्यूब सेन्सर टेक्नोलॉजीवर (carbon nanotube sensor technology) ती संशोधन करत असल्याचं सांगितलं. ते ऐकून तिच्या आईला आश्चर्य वाटलं. वयाच्या अकराव्या वर्षी गीतांजलीने ‘डिस्कव्हरी एज्यूकेशन 3 एम सायंटिस्ट चॅलेंज’ ही स्पर्धा जिंकली. तिच्या संशोधनासाठी फोर्ब्सच्या (Forbes)30 वर्षांच्या आतील 30 जणांच्या यादीत तिचा (30 Under 30) समावेश झाला होता.
काय सांगता राव! पोरीने ऑनलाईन जेवण मागवलं, ४२ डिलिव्हरी बॉईज जेवण घेऊन पोहोचले, मग....
सायबर बुलिंग थांबवण्यासाठी करण्यात आलेल्या संशोधनाबाबत बोलताना तिने सांगितले की, ''हे एका सेवेप्रमाणे आहे. या कार्यप्रणालीचे नाव Kindly आहे. हे एक अॅप आणि क्रोम एक्सटेंशन आहे. ज्याद्वारे सुरूवातीलाच सायबर बुलिंगला पकडलं जाऊ शकतं. यासाठी आर्टिफिशिलय इंटेलिजेंस टेक्नोलॉजीची मदत घेतली जाऊ शकते. ही कार्यप्रणाली तयार करून जगाच्या समस्या सोडवण्याचा माझा उद्देश आहेच पण इतरांनाही असं करण्यासाठी मला प्रेरित करायचे आहे. ''
Introducing the first-ever Kid of the Year, Gitanjali Rao https://t.co/Hvgu3GLoNspic.twitter.com/4zORbRiGMU
— TIME (@TIME) December 3, 2020
लय भारी! ऑस्ट्रेलियन मुलीला प्रपोज करणाऱ्या भारतीयाने सांगितली Love Story, आधी फेसबूकवर शोधलं मग....
गीतांजली आता वेदनाशामक औषधांचं व्यसन शोधून काढून म्यु-ओपाईड रिसेप्टर जनुकाद्वारे (mu-opioid receptor gene)होणाऱ्या प्रोटीन उत्पादनावर आधारीत हे संशोधन करत आहे. 2018 मध्ये तिने अमेरिकेतील मानाचा, पर्यावरण संरक्षण संस्था प्रेसिडेंट एन्व्हायर्नमेंटल युथ पुरस्कार (President’s Environmental Youth Award) मिळवला होता. जेनेटीक्सची प्रचंड आवड असलेल्या गीतांजलीला एमआयटीमधून (MIT) जेनेटीक्स आणि साथीचे रोग या विषयात शिक्षण घेण्याची इच्छा आहे.