VIDEO: भारतीय सुरक्षा दलांचा 'बुलस्ट्राइक'; ऑपरेशनचा थरार कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 08:43 PM2019-05-13T20:43:16+5:302019-05-13T20:45:12+5:30
सुरक्षा दलाच्या 170 जवानांचा ऑपरेशनमध्ये सहभाग
नवी दिल्ली: भारतीय सुरक्षा दलांनी अंदमान निकोबार बेटांवर पॅरा-ड्रॉप ऑपरेशन केलं. याला 'बुलस्ट्राइक' असं नाव देण्यात आलं होतं. भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलानं यात सहभाग घेतला होता. 9 मे रोजी सुरक्षा दलांनी तेरेसा बेटावर केलेल्या या सरावाचा व्हिडीओ भारतीय हवाई दलानं शेअर केला आहे.
ऑपरेशन बुलस्ट्राइकमध्ये सुरक्षा दलांचे एकूण 170 जवान सहभागी झाले होते. यात लष्कराच्या 149, हवाई दलाच्या 12 आणि नौदलाच्या 9 स्कायडायव्हर्सचा समावेश होता. या डायव्हर्सनी विमानातून उड्या घेत ऑपरेशन यशस्वी केलं. तिन्ही सुरक्षा दलांनी एकत्रितपणे केलेल्या कारवाईचं सामर्थ्य दाखवण्यासाठी हा सराव करण्यात आला. हवाई दलानं या सरावाचा चित्तथरारक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिन्ही दलांचे जवान हवाई दलाच्या सी-130J विमानातून झेपावताना दिसत आहेत.
Ex #BullStrike - Indian Armed Forces showcased their joint ops capability by undertaking company level airborne operation at Teressa Island, Andaman & Nicobar.
— Indian Air Force (@IAF_MCC) May 13, 2019
On 09 May 19, 170 troops from the three services undertook para drop ops in a Combat Free Fall & Static Line mode. pic.twitter.com/aPkLy5vLwq
गेल्या डिसेंबरमध्ये भारतीय हवाई दलाच्या आकाशगंगा या स्कायडायव्हिंग टीमनं आकाशात 30x20 फुटांचे दोन झेंडे फडकवले होते. हा कामगिरीसह टीमनं विक्रमाची नोंद केली होती. तर फेब्रुवारीत हवाई दलाच्या एअर डेव्हिल टीमनं एन-32 विमानातून पॅराजम्पिंग केलं होतं. हवाई दलाच्या 43 व्या स्कॉड्रनला 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं हे थरारक प्रात्यक्षिक करण्यात आलं.