भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अग्निवीरमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 02:57 PM2023-03-13T14:57:55+5:302023-03-13T15:08:28+5:30

Indian Army Agniveer Recruitment 2023: भारतीय लष्कराने अग्निवीर भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ दिवसांनी वाढवली आहे.

indian army agniveer recruitment 2023 last date extended apply till 20 march | भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अग्निवीरमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली

भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अग्निवीरमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली

googlenewsNext

Agniveer Recruitment 2023: अग्निवीरमध्ये भरती होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय लष्कराने अग्निवीर भारतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे. आता उमेदवार २० मार्च २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०२३ होती, ही आता  ५ दिवसांनी वाढवण्यात आली आहे. या संदर्भात भारतीय लष्कराने नोटीफीकेशन जारी केली.

भारतीय लष्कराने अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर एक नोटीस देखील जारी केली आहे. भारतीय सैन्यात अग्निवीर भरती अंतर्गत, स्टोअर कीपर, लिपिक आणि तांत्रिक पदांसह अनेक पदांवर भरती केली जाईल. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १६ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू झाली आहे.

भारतीय नौदल चीनचे टेन्शन वाढवणार! २०० ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तैनात करणार

विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता स्वतंत्रपणे विहित करण्यात आली आहे. काही पदांसाठी ८वी पास, तर काहींसाठी १०वी आणि १२वी उत्तीर्ण अशी कमाल शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. 

या भरतीअंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १७ वर्षे ६ महिने ते २१ वर्षे दरम्यान असावे, अशी अट आहे.

भारतीय लष्कराने यावेळी अग्निवीर भरती निवड प्रक्रियेत बदल केले आहेत. यावेळी पहिल्यांदा लेखी परीक्षा होणार असून, त्यानंतर मैदानावरील चाचणी होणार आहे. लेखी परीक्षेतील यशस्वी उमेदवारच भरती मेळाव्यात उपस्थित राहू शकतात. ही परीक्षा १७ एप्रिल २०२३ रोजी घेतली जाईल.

भारतीय वायुसेनेमध्ये अग्निवीर वायु पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in द्वारे उमेदवार ३१ मार्चपर्यंत नोंदणी करू शकतात. 

Web Title: indian army agniveer recruitment 2023 last date extended apply till 20 march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.