Army Helicopter Crashed: जम्मू-काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळले, बचाव कार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 03:34 PM2022-03-11T15:34:28+5:302022-03-11T15:35:21+5:30

Army Helicopter Crashed: हेलिकॉप्टर कोसळले, त्या भागात जोरदार बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे, अपघातस्थळी पायी किंवा हेलिकॉप्टरने पोहोचण्यास अडचणी येत आहेत.

Indian Army Cheetah helicopter has crashed in the Baraum area of Gurez sector of Jammu and Kashmir | Army Helicopter Crashed: जम्मू-काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळले, बचाव कार्य सुरू

Army Helicopter Crashed: जम्मू-काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळले, बचाव कार्य सुरू

Next

श्रीनगर:जम्मू-काश्मीरमधील(Jammu and Kashmir) गुरेझ सेक्टरमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर आली आहे. माहिती मिळताच सुरक्षा दलांनी बचाव मोहीम राबवण्याची तयारी सुरू केली. हेलिकॉप्टरमधील कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी बचाव पथक बर्फाळ भागात पोहोचले आहे. वैमानिक आणि सहवैमानिक सुखरूप असल्याचे सांगितले जात आहे, परंतु अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील गुरेझच्या तुलैल परिसरात नियमित उड्डाण करत असताना भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टर हवेत असताना त्यांचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. थोड्यावेळानंतर हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली. यानंतर भारतीय लष्कर आणि हवाई दलाने तातडीने एक बचाव पथक गुजरन नाला परिसरात पाठवले.

लष्कराकडे 200 चित्ता हेलिकॉप्टर आहेत
चित्ता हे एक इंजिन असलेले हेलिकॉप्टर आहे, ज्यामध्ये मूव्हिंग मॅप डिस्प्ले, ग्राउंड प्रॉक्सिमिटी वॉर्निंग सिस्टम आणि वेदर रडार यासारख्या प्रमुख वैशिष्ट्यांचा अभाव आहे. यात ऑटोपायलट प्रणाली देखील नाही. लष्कराकडे अशाप्रकारचे 200 हेलिकॉप्टर आहेत. गेल्या काही वर्षांत या हेलिकॉप्टरमुळे 30 हून अधिक अपघात झाले असून त्यात 40 हून अधिक अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

नवीन हेलिकॉप्टर आणण्याची योजना
संरक्षण मंत्रालयाच्या महितीनुसार, ऑपरेशनल आवश्यकता लक्षात घेऊन चित्ता आणि चेतक हेलिकॉप्टरसह सुरक्षा दलांच्या विमानांच्या ताफ्याचा वेळोवेळी आढावा घेतला जातो. सरकारने या हेलिकॉप्टरला नेव्हल यूटिलिटी हेलीकॉप्टर, स्वदेशी लाइट यूटिलिटी हेलिकॉप्टर (LUH) सोबत बदलण्याची योजना बनवली आहे. याचे निर्मिती HAL “बाय (इंडियन-आयडीडीएम)” प्रोजेक्ट अंतर्गत केले आहे. तसेच,  रशिया निर्मीत Ka-226T ला “बाय अँड मेक (इंडियन)” द्वारे बनवण्यात आले आहे.

Web Title: Indian Army Cheetah helicopter has crashed in the Baraum area of Gurez sector of Jammu and Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.