भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं; दोन्ही वैमानिक सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 06:40 PM2020-02-03T18:40:41+5:302020-02-03T18:42:47+5:30
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
जम्मू-काश्मीर - रियासी जिल्ह्यात आज सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास भारतीय लष्कराचं ‘चीता’ हे हेलिकॉप्टर कोसळलं आहे. या दुर्घटनेतून दोन्ही वैमानिक सुखरूप बचावले आहेत. जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील माहोर येथे ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Jammu and Kashmir: An Army Cheetah chopper crashed near Reasi district in Jammu around 11:15 am, earlier today. Both pilots are safe. pic.twitter.com/KUztoSxfUk
— ANI (@ANI) February 3, 2020
या हेलिकॉप्टरने उधमपूर येथून उड्डाण केले होते. त्यानंतर ही दुर्घटना घडली. याप्रकरणी लष्कराकडून चौकशी केली जात असून याआधी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये पूर्व भूतान येथे देखील चीता हेलिकॉप्टर कोसळले होते. त्यावेळी घडलेल्या दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर असणाऱ्या रजनीश परमार व वैमानिक कॅप्टन कालझँग वांगडी यांचा समावेश होता.
जम्मू-काश्मीर - रियासी जिल्ह्यात सोमवारी भारतीय लष्कराचं ‘चीता’ हे हेलिकॉप्टर कोसळलं https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) February 3, 2020