ब्रेकिंग! जम्मू-काश्मीरमधील धरण परिसरात लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं; मदतकार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 12:06 PM2021-08-03T12:06:43+5:302021-08-03T12:23:35+5:30
सकाळी सव्वा दहाच्या सुमारास हेलिकॉप्टरला अपघात; धरण क्षेत्रात हेलिकॉप्टर कोसळलं
श्रीनगर: जम्मू काश्मीरच्या कठुआ जवळ भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं आहे. कठुआतील रणजीत सागर धरणात हेलिकॉप्टर कोसळलं. सध्या मदतकार्य सुरू असून सर्च ऑपरेशन सुरू आहे. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळलं आहे.
PATHANKOT (PUNJAB) : ARMY AVIATION HELICOPTER CRASH NEAR RANJIT SAGAR DAM / VISUALS https://t.co/8nAcSQYYQWpic.twitter.com/0TrkvUxVSt
— AMITA NANDAL (@amitanandal88) August 3, 2021
धरणात हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळताच तातडीनं बचावकार्य सुरू करण्यात आलं. प्राप्त माहितीनुसार, सकाळी १० वाजून २० मिनिटांनी लष्कराच्या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं होतं. हेलिकॉप्टर धरण परिसरात कमी उंचीवर घिरट्या घालत होतं. त्याचवेळी ते धरणात कोसळलं.
घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम धरण परिसरात पोहोचली. सध्या पाणबुड्यांच्या मदतीनं धरणात बचावकार्य सुरू आहे. हेलिकॉप्टरमध्ये किती जण होते, हा अपघात नेमका कसा झाला याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या वर्षाच्या सुरुवातीलादेखील लष्कराचं एक हेलिकॉप्टरमध्ये जम्मूमध्ये दुर्घटनाग्रस्त झालं. त्यात दोन पायलट होते. त्यातल्या एकाचा मृत्यू झाला.