सर्वत्र बर्फ, उणे तापमान, हिमवर्षाव; काश्मीर खोऱ्यात जवानांची शिवरायांना अनोखी मानवंदना!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 11:15 PM2024-02-19T23:15:00+5:302024-02-19T23:22:20+5:30
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024: अतिशय आव्हानात्मक परिस्थितीतही भारतीय जवानांनी काश्मीर खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत अनोखी सलामी दिली.
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यातच काश्मीर खोऱ्यातील कुपवाडा येथे उणे तापमानात हिमवर्षाव होत असताना भारतीय लष्कराच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी सलामी दिली. याचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या ठिकाणी मराठा बटालियनच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी सलामी दिली. काश्मीर खोऱ्यात हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला.
काश्मीर खोऱ्यात जवानांची शिवरायांना अनोखी मानवंदना!
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमानात लष्कराच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय लष्कराच्या जवानांचे अभिनंदन करीत त्यांचे कौतुक केले.
काश्मीर खोऱ्यात हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष...
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 19, 2024
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या ठिकाणी #शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमानात लष्कराच्या जवानांनी… pic.twitter.com/S6S4Y3bxXI