भारतीय सैनिकांकडे येणार 'Iron Man' सूट; इंडियन आर्मीने दिली जेटपॅक सूटची ऑर्डर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 01:24 PM2023-01-25T13:24:54+5:302023-01-25T13:26:26+5:30
Indian Army ने संवेदनशील सीमा भागात पाळत ठेवण्यासाठी जेटपॅक सूटची ऑर्डर दिली आहे.
Indian Army Jet Pack Suit : भारतीय लष्कराने संवेदनशील सीमा भागात पाळत ठेवण्यासाठी आणि लढाऊ क्षमता मजबूत करण्यासाठी 130 प्रगत ड्रोन यंत्रणा खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासोबतच लष्कर अॅक्सेसरीजसह 100 'रोबोटिक म्युल्स'ची प्रक्रियाही सुरू करत आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी (24 जानेवारी) ही माहिती दिली.
अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, 'बाय-इंडियन' श्रेणीतील फास्ट-ट्रॅक प्रक्रियेअंतर्गत आपत्कालीन खरेदी अंतर्गत टेथर्ड ड्रोनची खरेदी केली जात आहे. या श्रेणी अंतर्गत, सैन्याने आपत्कालीन खरेदी अंतर्गत 48 जेट पॅक सूट खरेदी करण्यासाठी इच्छुक युनिट्सकडून विनंती पत्र मागवले आहे.
जेट पॅक सूटची खासियत?
भारतीय लष्कराने 48 जेट पॅक सूट खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या जेट पॅक सूटचे अनेक फायदे आहेत. सीमेवर तैनात असलेले सैनिक जेट पॅक सूट परिधान करून गंभीर परिस्थितीतही उड्डाण करू शकतात. जेट पॅक सूटमध्ये पाच गॅस टर्बाइन जेट इंजिन आहेत, जे सुमारे 1000 हॉर्सपॉवरची ऊर्जा निर्माण करतात. हे इंजिन डिझेल किंवा रॉकेलवर चालवता येतात. जेट पॅक सूटचा वेग ताशी 50 किमी आहे.
अशी आहे ड्रोनची खासियत
टेथर्ड ड्रोन सिस्टीममध्ये ड्रोन असतात जे जमिनीवर 'टिथर स्टेशन'शी संलग्न असतात आणि विस्तारित कालावधीसाठी व्हिज्युअल श्रेणीच्या पलीकडे लक्ष्यांचे निरीक्षण करू शकतात. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रत्येक ड्रोन प्रणालीमध्ये दोन हवाई वाहने, एकल-व्यक्ती पोर्टेबल ग्राउंड कंट्रोल स्टेशन, एक टिथर स्टेशन, एक रिमोट व्हिडिओ टर्मिनल आणि पेलोडसह इतर घटक असतील. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख 14 फेब्रुवारी आहे.
सैन्याला पाळत ठेवण्यास मदत होईल
मे 2020 मध्ये सुरू झालेल्या पूर्व लडाख सीमेनंतर भारतीय लष्कर जवळपास 3,500 किमी लांबीच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) आपली पाळत ठेवणारी यंत्रणा मजबूत करत आहे. लष्कराने अॅक्सेसरीजसह 100 'रोबोटिक म्युल्स'ची प्रक्रियाही सुरू केली आहे. 6 फेब्रुवारी ही निविदा सादर करण्याची अंतिम तारीख असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.