भारत हजारो कोटींचा दारुगोळा मागवणार, शत्रूला धडकी भरणार; किंमत जाणून थक्क व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 10:02 IST2025-01-20T10:01:52+5:302025-01-20T10:02:26+5:30
यासंदर्भात माहिती देताना आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले, पिनाकाच्या दोन वेगवेगळ्या प्रकारांसाठी दोन करार केले जाणार आहेत...

भारत हजारो कोटींचा दारुगोळा मागवणार, शत्रूला धडकी भरणार; किंमत जाणून थक्क व्हाल!
भारतीय लष्कर स्वदेशी बनावटीच्या पिनाका मल्टी-लॉन्च आर्टिलरी रॉकेट सिस्टिमने पूर्णपणे सुसज्ज होण्यावर भर देत आहे. यासंदर्भात लवकरच एक मोठी डील होणार आहे. खरे तर, भारतीय लष्कराला पिनाका रॉकेट सिस्टिमसाठी मोठ्या प्रमाणावर दारुगोळ्याची आवश्यकता आहे. यामुळे याच आर्थिक वर्षात 10,200 कोटी रुपयांची ऑर्डर केली जाणार आहे.
यासंदर्भात माहिती देताना आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले, पिनाकाच्या दोन वेगवेगळ्या प्रकारांसाठी दोन करार केले जाणार आहेत. एक करार ५,७०० कोटी रुपयांचा आहे आणि दुसरा ४,५०० कोटी रुपयांचा आहे, ज्यावर चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी अर्थात ३१ मार्च रोजी स्वाक्षरी केला जाईल.
सध्या भारतीय लष्करात १० पिनाका रेजिमेंट तयार करण्यात आल्या आहेत. यांपैकी ४ रेजिमेंट आधीच तैनात करण्यात आल्या आहेत, त्यांचे काही लाँचर्स चीनला लागून असलेल्या उत्तरेकडील सीमेवर उंच भागात तैनात करण्यात आले आहेत. याशिवया उर्वरित ६ रेजिमेंट देखील तैनातीच्या प्रक्रियेत आहेत. पिनाका ही जगातील सर्वोत्तम रॉकेट प्रणालींपैकी एक आहे. ही प्रणाली उंचावर मारा करण्यास सक्षम आहे.
आर्मेनियातून मिळालीय ऑर्डर -
गेल्या वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात या प्रणालीची यशस्वी चाचणी घेण्यात आली. चाचणीनंतर लगेचच, या प्रणालीला परदेशातूनही ऑर्डर मिळायला सुरुवात झाली आहे. आर्मेनियाने भारताकडून पिनाका रॉकेट खरेदी करण्यासाठी करार केला आहे. डीआरडीओने पिनाका प्रणालीसाठी विविध प्रकारची शस्त्रास्त्रे विकसित केली आहेत. यांत ४५ किमी आणि ७५ किमी मार्गदर्शित विस्तारित श्रेणीच्या रॉकेटचा समावेश आहे. ही श्रेणी १२० किमी आणि नंतर ३०० किमीपर्यंत वाढवण्यावर काम सुरू आहे.
यासंदर्भात बोलातना जनरल द्विवेदी म्हणाले, आम्हाला पिनाका रॉकेट्सची लांब पल्ल्याची रेंज मिळल्यानंतर, आपण इतर पर्यायी लांब पल्ल्याच्या शस्त्रांऐवजी या प्रणालीवर लक्ष केंद्रित करू शकतो.