PoKमध्ये लष्कराची कारवाई; दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त, पाकचे 11 सैनिक व 22 दहशतवादी ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 12:38 PM2019-10-20T12:38:48+5:302019-10-20T13:16:06+5:30
पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन
जम्मू-काश्मीर : भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. मात्र, पाकिस्तानच्या या नापाक कृत्यानंतर भारतीय लष्कराने प्रत्युत्तरादाखल मोठी कारवाई केली आहे. भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत.
भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील तांगधर सेक्टरमध्ये घुसून कारवाई सुरू केली आहे. यावेळी जवानांनी दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले. तसेच, उखळी तोफांचा मारा केला. यात दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईमुळे दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराने मोठा दणका दिला आहे.
Indian army has used artillery guns to target the terrorist camps which have been actively trying to push terrorists into Indian territory. https://t.co/MHfOLqbYUr
— ANI (@ANI) October 20, 2019
सुत्रांच्या माहितीनुसार, भारतीय लष्कराच्या जवानांनी केलेल्या कारवाईत 11 पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. तर 22 हून अधिक दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातले आहे.
Sources: As per reports, 4-5 Pakistan Army soldiers have been killed and several have been injured. Indian Army has launched attacks on terrorist camps situated inside Pakistan occupied Kashmir (PoK) opposite the Tangdhar sector. pic.twitter.com/SFFFjAReHX
— ANI (@ANI) October 20, 2019
दरम्यान, आज पाकिस्ताने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील तांगधर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून लष्करी चौक्या आणि गावांना लक्ष्य करून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तांगधर सेक्टरमध्ये तैनात असलेले दोन जवान शहीद झाले आहेत. तर एका नागरिकाचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त तीन नागरिक जखमी झाले आहेत. याशिवाय, पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात परिसरातील दोन घरांचे नुकसान झाले आहे. भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनीही पाक सैन्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
Jammu and Kashmir: Besides the death of 2 Army jawans & a civilian in the ceasefire violation by Pakistan in Tangdhar sector today, 3 others were injured. 1 house and a rice godown completely damaged, 2 cars damaged and 2 cow shelters with 19 cattle & sheep inside, destroyed. https://t.co/Gm4a48s79l
— ANI (@ANI) October 20, 2019
पाकव्याप्त काश्मीरमधून 500हून अधिक दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत
पाकव्याप्त काश्मीरमधून 500 दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या उच्चाधिकाऱ्यांनी दिली आहे. PoKमधल्या नियंत्रण रेषेजवळ विविध प्रशिक्षण शिबिरांमध्ये 500 दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीची संधी शोधत आहेत. तसेच 200 ते 300 दहशतवादी पाकिस्तानच्या मदतीनं या क्षेत्राला अशांत ठेवण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्येच सक्रिय आहेत.
अनंतनागमध्ये लष्कराकडून हिजबुलच्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा
काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात गेल्या बुधवारी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तिन्ही दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतावादी संघटनेचे सदस्य होते. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये हिजबुलचा कमांडर नासिर चद्रू याचाही समावेश आहे.