ट्विटरकडून भारतीय सेनेच्या Chinar Corpsचं चुकून सस्पेंड केलेलं अकाऊंट पुन्हा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 01:31 PM2019-06-07T13:31:48+5:302019-06-07T13:32:12+5:30
मायक्रो ब्लॉगिंग साइट असलेल्या ट्विटरनं भारतीय Chinar Corpsचं चुकून सस्पेंड केलेलं अकाऊंट पुन्हा सुरू केलं आहे.
नवी दिल्लीः मायक्रो ब्लॉगिंग साइट असलेल्या ट्विटरनं भारतीय Chinar Corpsचं चुकून सस्पेंड केलेलं अकाऊंट पुन्हा सुरू केलं आहे. काल ट्विटरनं Chinar Corpsच्या 15 Corpsचे हे अकाऊंट सस्पेंड केलं होतं. Chinar Corpsही जम्मू-काश्मीरमधल्या एलओसीवर तैनात आहे. चिनार कॉर्प्स हे जम्मू-काश्मीरमधल्या भारतीय लष्करांचा महत्त्वाचा भाग आहे. जम्मू-काश्मीरमधल्या दहशतवादविरोधी अभियानाची जबाबदारी चिनार कॉर्प्सवर आहे.
मीडिया रिपोर्ट्नुसार, भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, जेव्हा ट्विटर अकाऊंट सस्पेंड केलं, त्यानंतर ट्विटरशी संपर्क साधण्यात आला होता. ट्विटर काल संध्याकाळपर्यंत अकाऊंट पुन्हा सुरू होणार असल्याचं सांगितलं होतं. Chinar Corpsचे ट्विटरवर फॉलोअर्स 40 हजारांच्या घरात आहेत. 1.8 मिलियन अकाउंटची पडताळणीदरम्यान Chinar Corpsचे अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते.
After suspending the Army’s Srinagar-based 15 Corps twitter handle @ChinarcorpsIA yesterday, twitter has restored it today. Army sources say to avoid such things in future, they will now start the process of getting it verified. pic.twitter.com/NmOlyNA5VI
— ANI (@ANI) June 7, 2019
काही वर्षांपूर्वीच भारतीय लष्कराला सोशल मीडियावर सक्रिय राहण्यास सांगण्यात आलं होतं. जेणेकरून पाकिस्तानकडून भारतासंदर्भात पसरवण्यात येणाऱ्या खोट्या बातम्यांना आळा घालण्यात येईल. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधातल्या अभियानासंदर्भात Chinar Corps अकाऊंटवरूनच मिळत असते.