भारतीय बीएसएफनं शत्रू राष्ट्राला घडवलं माणुसकीचं उत्तम उदाहरण
By admin | Published: June 13, 2016 09:26 PM2016-06-13T21:26:17+5:302016-06-13T21:26:17+5:30
भारतीय जवानांनी त्या मुलांना चॉकलेट आणि गिफ्ट देऊन सुखरूपरीत्या पाकिस्तानात परत पाठवलं
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13- पाकिस्तान भारताविरोधात कुरापती करण्यात नेहमीच अग्रेसर असतो. कधी सीमेवर गोळीबार, तर कधी दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत करत असतो. मात्र पाकिस्तानला भारतीय लष्करानं माणुसकीचं उत्तर दर्शन घडवलं आहे.
पाकिस्तानची सीमा ओलांडून नातेवाईकांनी भेटण्यासाठी आलेल्या तीन मुलांनी अपघातानं भारतीय सीमेच्या हद्दीत प्रवेश केला होता. मात्र भारतीय जवानांनी त्या मुलांना चॉकलेट आणि गिफ्ट देऊन सुखरूपरीत्या पाकिस्तानात परत पाठवलं आहे.
भारतीय लष्कर सेनाप्रमुख मीना यांनी पाकिस्तानचे विंग कमांडर यांची भेट घेऊन या मुलांना सुपूर्द केले. "मुलं भारतीय हद्दीत कोणत्याही उद्देशानं आली नव्हती. रमझाननिमित्त आम्ही त्यांना गिफ्ट दिलं. ते पूर्ण दिवस उपाशी होते. त्यामुळे आम्ही त्यांना चॉकलेट्स दिली", अशी माहिती भारतीय लष्कर सेनाप्रमुख मीना यांनी दिली आहे.