चीनने बुलडोझरने उध्वस्त केले भारतीय बंकर्स

By admin | Published: June 28, 2017 08:39 PM2017-06-28T20:39:21+5:302017-06-28T20:39:21+5:30

चीनच्या घुसखोरीमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाच चीनने बुलडोझरच्या सहाय्याने भारतीय बंकर उध्वस्त केल्याची नवी माहिती समोर आली आहे.

The Indian bunkers have been shattered by bulldozer by China | चीनने बुलडोझरने उध्वस्त केले भारतीय बंकर्स

चीनने बुलडोझरने उध्वस्त केले भारतीय बंकर्स

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 28 - चीनच्या घुसखोरीमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाच चीनने बुलडोझरच्या सहाय्याने भारतीय बंकर उध्वस्त केल्याची नवी माहिती समोर आली आहे. भारत, चीन आणि भूटानची सीमा जिथे सिक्कीममध्ये मिळते. तिथे भारतीय सैन्याचा हा जुना बंकर होता. बंकर पाडण्याची चीनची मागणी भारताने फेटाळून लावल्यानंतर चीनने जबरदस्तीने बुलडोझर आणून हा बंकर उध्वस्त केला. 
 
जूनच्या पहिल्या आठवडयात सिक्कीमच्या डोका ला भागात ही घटना घडली. दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आल्याने या भागात तणाव आहे. भारत आणि चीनमध्ये जम्मू-काश्मीरपासून अरुणाचलप्रदेश पर्यंत 3,488 किलोमीटरची सीमा पसरली आहे. त्यात 220 किलोमीटरचा भाग सिक्कीममधून जातो. 
 
आणखी वाचा
आम्हाला नडू नका, भारताला नाही झेपणार - चीन 

 

भारत-अमेरिकेची वाढलेली जवळीक तसेच भारताने दलाई लामा यांच्या अरुणाचलप्रदेश दौ-याला दिलेली परवानगी त्यामुळे चीनचा सध्या भारतावर जळफळाट वाढला आहे. बंकर नष्ट करणे असो किंवा मानस सरोवरला जाणा-या यात्रेकरुंचा मार्ग रोखणे हा सर्व चीनच्या आठमुठया धोरणाचा भाग आहे. डोका ला येथील परिस्थितीसंदर्भात राज्य सरकारने केंद्राला अहवाल पाठवला आहे. 
 
दरम्यान भारत नियमबाहय कामे करत असून त्यांना नियम शिकवण्याची गरज असल्याचे ग्लोबल टाइम्स या चीन सरकारच्या वर्तमानपत्राने म्हटले आहे.  भारताला अमेरिका आणि अन्य पाश्चात्य देश पाठिंबा देत असल्याने आपण सैनिकी दृष्टया वरचढ असल्याची भारताची भावना असून त्यामुळे भारत उद्दामपणा करतोय असे ग्लोबल टाइम्सच्या लेखात म्हटले आहे. भारताचा जीडीपी जगात पाचव्या क्रमांकावर असल्याने देश म्हणून भारताचा आत्मविश्वास सध्या भलताच उंचावला आहे. पण भारत अजून चीनपेक्षा भरपूर मागे आहे हे भारताने लक्षात घ्यावे असे ग्लोबल टाइम्समध्ये म्हटले आहे. 
 
सीमा मुद्यावर आमच्यासोबत शक्तिपरीक्षा भारताला परवडणारी नाही असे म्हटले आहे. सीमावादाला भारताकडून चिथावणी मिळते तरीही, चीन शांतता आणि संयम राखून असल्याचे लेखात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर भारत आणि अमेरिकेच्या वाढलेली जवळीकही चीनला खटकली असून, चीनचा तिळपापड झाला आहे. 
 

Web Title: The Indian bunkers have been shattered by bulldozer by China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.