कंदील बलोचला हवं होतं भारतीय नागरिकत्व
By admin | Published: July 18, 2016 11:09 AM2016-07-18T11:09:07+5:302016-07-18T11:16:03+5:30
पाकिस्तानमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेल्या अभिनेत्री व मॉडेल कंदील बलोचला भारतीय नागरिकत्व हवं होतं
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 18 - पाकिस्तानमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेल्या अभिनेत्री व मॉडेल कंदील बलोचला भारतीय नागरिकत्व हवं होतं. कंदील बलोचने ट्विटच्या माध्यमातून पाकिस्तानाकडून माझी निराशा झाली असून भारतीय नागरिकत्व हवं असल्याचं म्हटलं होतं. या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करण्यात आलं होतं. अदनान सामीला भारतीय नागरिकत्व मिळाल्यापासून अनेक पाकिस्तानी कलाकरांनी भारतात स्थायिक होण्याची इच्छा व्यक्त केली होती.
कोलकात्यातील ईडन गार्डनवरील भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान विजयी झाल्यास स्ट्रिप डान्स करण्याची घोषणा करणारी पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्री व मॉडेल कंदील बलोच हिची मुलतान येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. कंदील हिच्या भावानेच ही हत्या केली आहे. पोलिसांनी तिच्या भावाला अटक केली आहे.
हत्या होण्याच्या आधी काही दिवसांपुर्वी कंदील बलोचने मुलाखत दिली होती. 'पाकिस्तानातील लोक मला स्विकारण्यास तयार नाहीत. भारतात काम करणं माझ्यासाठी खूप सोपं आहे', असं म्हटलं होतं. कंदील बलोचला तिच्या बोल्ट फोटो, व्हिडिओजमुळे कुटुंबाकडून धमक्या मिळत होत्या. आपल्याला सुरक्षा पुरवण्याची मागणीही तिने सुरक्षा यंत्रणांकडे केली होती.
कंदीलचा छोटा भाऊ वसीमला डेरा गाजी खान येथून अटक करण्यात आली होती. बहिणीला अंमली द्रव्य देऊन नंतर तिची गळा आवळून हत्या केली असल्याचं त्याने मान्य केलं आहे. सोशल मीडियावर आपत्तीजनक व्हिडिओ आणि वक्तव्य प्रसिद्ध करुन तिनं बलौच कुटुंबाचं नाव धुळीला मिळवलं होतं, त्यामुळे तिची हत्या केल्याची कबुली वसीमने दिल्याची माहिती ‘द डॉन’ने दिली होती.
पाकिस्तानमधील प्रसिद्ध मॉडेल असलेली कंदील ही तिचे फोटो व खळबळजनक विधानांमुळे नेहमीच चर्चेत असायची. काही महिन्यांपूर्वीच तिने विराट कोहलीबद्दल प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. तर त्यापूर्वी तिने पाकिस्तानने वर्ल्डकप जिंकल्यास स्ट्रीप डान्स करण्याची खळबळजनक घोषणा केली होती.